कार शिकवणे जीवावर बेतले, ब्रेक देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय ठेवला दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

कार शिकवणे जीवावर बेतले, ब्रेक देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय ठेवला दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

बुलढाण्यातील देऊळगाव राजा शहराच्या रामनगर परिसरात टाटा टियागो कार विहिरीत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. यामध्ये मायलेकीसह तिघांचा मृत्यू झाला असलायचं समोर आले. या कारमध्ये तीन जण होते, त्यामधील चालक सुखरुप बचावला आहे. पण आई आणि मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चाळीस फूट विहिरीत कारचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : 

Imran Khan Firing : इम्रान खान यांच्या हल्लेखोराची कबुली म्हणाला, ‘मैं मारना चाहता था…’ व्हिडीओ झाला व्हायरल

विहिरीत पडलेली कार तब्बल सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर विहिरीतून बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आलं. कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर सीटबेल्ट लावलेल्या अवस्थेत महिलेचा तर पाठीमागील सीट वर मुलीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. कार विहिरीमध्ये पडल्यानंतर चालक (पती) पोहून विहीरवर आला. मात्र महिला व लहान मुलगी कार मध्येच अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या होत्या. कार पूर्णपणे विहिरीत ४० फूट पाण्यात बुडालेली होती. सहा तासानंतर कारला बाहेर काढण्यात यश आलं आहे. पण कारमध्ये असणाऱ्या आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

T20 World Cup 2022 : सेमी फायनलसाठी पाकिस्तानचा मार्ग मोकळा आता भारताचं काय ?

Exit mobile version