सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्येही वाघांचं दर्शन होणार, वनमंत्र्यांची माहिती

चंद्रपूर जिल्ह्यातील ८ वाघ सह्याद्रीच्या परिसरात सोडणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जगातील फक्त 14 देशांमध्ये वाघ आढळतात. यापैकी सरासरी ६५ टक्के वाघ हे फक्त भारतात असल्याचे पाहायला मिळते.

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्येही वाघांचं दर्शन होणार, वनमंत्र्यांची माहिती

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात वाघांची (Tiger) संख्या ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे मनवी जीवन आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढत आहे. याच सर्व गोष्टींचा विचार करून वन विभागाने (Forest Deparment) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ८ वाघ सह्याद्रीच्या परिसरात सोडणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे
अधिकृत परवानगी मागितली असल्याचं देखील वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा अभयारण्य (tadoba national park) आहे. इथे वाघांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे चंद्रपूरात वाघ मोठ्या प्रमाणात आढळून येतात. जगातील फक्त १४ देशांमध्ये वाघ आढळतात. यापैकी सरासरी ६५ टक्के वाघ हे फक्त भारतात असल्याचे पाहायला मिळते. ताडोबा अभयारण्यामध्ये दोन वाघ हे नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत. इतर वाघांनासुध्दा आता स्थलांतरित करण्यात येईल अशी योजनाच सरकारकडून आखण्यात येत आहे.

त्यामुळे आता फक्त चंद्रपुर जिल्ह्यातच नाही तर सह्याद्रीच्या रांगांमध्येही वाघ पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी देखील योग्य योजना तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने यासाठी परवानगी दिली की हे वाघ सह्याद्रीच्या जगलांमध्ये सोडण्यात येणार आहे. या वाघांचं दर्शन आता केवळ ताडोबामध्येच नाही तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये देखील होणार आहे.

ताडोबा अभयारण्यमध्ये अनेक पर्यटक व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येतात. तर त्या पर्यटकांचा मान राखला गेला पाहिजे. तसेच त्यांना योग्य ती वागणूक देण्यात यावी अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच देशातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी त्यातील तीन व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

लँडर वेगळे झाल्यानंतर आज संध्याकाळी होणार डिबूस्टिंग, Chandrayaan-3 पोहोचेल चंद्राच्या जवळ…

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद

मुंबईत Mukesh Ambani यांच्यानंतर ‘या’ उद्योगपतीचं आहे सर्वात महागडं आणि मोठं घर …

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version