Koregaon Bhima कोरेगाव-भीमा परिसरात कडेकोट बंदोबस्त, विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथं नागरिकांची गर्दी

कोरेगाव भीमा या ठिकाणी आज २०५ वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या (Shaurya Din) पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे.

Koregaon Bhima कोरेगाव-भीमा परिसरात कडेकोट बंदोबस्त, विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथं नागरिकांची गर्दी

Koregaon Bhima : कोरेगाव भीमा या ठिकाणी आज २०५ वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या (Shaurya Din) पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सकाळी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.

कोरेगाव-भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळय़ासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी पेरणे फाटा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा बंदोबस्तात राहणार आहेत. अभिवादन सोहळय़ात होणारी गर्दी विचारात घेऊन पेरणे फाटा परिसरात २४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सोहळय़ावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच पोलिसांनी समाजमाध्यमांवरील मजकुरावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पुणे पोलीस, ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

 

कोरेगाव इथे १ जानेवारी १८१८ मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी यांच्यासह इतरही लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात.

या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आज येणार आहेत. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. २०५ वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. १ जानेवारी १९२७ ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

यंदाच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा परिसरात म्हणजेच शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या कालावधीत मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परिसरातील सर्व मद्य दुकाने पूणर्तः बंद राहणार आहेत. या बंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

 

हे ही वाचा:

Happy New Year ‘या’ देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

Happy New Year 2023 भारतात ३१ तारखेला १२ वाजता सुरुवात होणार नव्या वर्षाची, पण ‘या’ देशांमध्ये आधीच साजरे केले जातेय नवीन वर्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version