Time Maharashtra Exclusive, मोठी बातमी; आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण!

Time Maharashtra Exclusive, मोठी बातमी; आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण!

महाराष्ट्राला संत साहित्याची, समाजसेवेची, आध्यत्मिकतेची त्याच प्रमाणे कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक या सर्व गोष्टींचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. एकापेक्षा एक असलेल्या नररत्नांना महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदाचा २७ वा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) हा पुरस्कार दत्तात्रय नारायण धर्माधिकारी तथा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना देण्यात येणार आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि गौरवाची बातमी आहे.

या वर्षीचा पदमविभूषण (Padma Vibhushan) हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी याना मिळू शकला न्हवता. त्यामुळे त्याच्या बैठकीतील नागरिक, कार्यकर्ते यांना हुरहूर लागली होती. आणि तीच हुरहूर महाराष्ट्र सरकारने दूर करण्याचा निर्णय हा घेतला आहे. नानासाहेब धर्माधिकारी (Nanasaheb Dharmadhikari) म्हणजेच नारायण विष्णू धर्माधिकारी (Narayan Vishnu Dharmadhikari) त्यांचे आप्पासाहेब धर्माधिकारी हे चिरंजीव आहेत. नानासाहेबांच्या कार्याचा वसा हा अप्पासाहेब यांनी पुढे न्यायला सुरुवात ही केली होती. चालीरीती, सनातन रीतिरिवाज या सर्वांच्या पलीकडे जाऊन देव माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न हा श्री बैठकीच्या माध्यमातून केली जात आहे. नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आता सचिन आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या कार्याचा खूप मोठा ठसा हा महाराष्ट्रात उमटवला आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने २०१७ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०१४ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. संपूर्ण देशासह, पाकिस्तान, यूएई, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, इराण या सारख्या अनेक देशांमध्ये या संप्रदायाचे शिष्य हे सर्वदूर पसरलेले आहेत. पर्यावरणाची काळजी घेणं, आध्यत्मिक मार्गाचा अवलंब करत समाज सेवा करणं , ईश्वराची सेवा करणे हा या बैठकीचा एक साधा सोपा गुरुमंत्र आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आप्पासाहेब यांनी गेली आणिक वर्ष हे जोपासले आहे. आणि त्यातून देशसेवा, पर्यवर्णसेवा याचा मार्ग हा निवडला आहे. सोमवार दि. ३० जानेवारी रोजी रायगडचे जिल्हाधिकारी यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली होती. आणि सरकारच्या डोक्यात काय आहे हे त्यांनी त्यांना सांगितले होते.

नानासाहेब धर्माधिकारी (डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी) (१ मार्च १९९२ – ८ जुलै २००८) हे एक भारतीय आध्यात्मिक गुरू कम समाजसुधारक होते. यांचा जन्म शांडिल्य असे मूळ आडनाव असलेल्या कुटुंबात झाला. सुमारे ३५० वर्षांपूर्वी, त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यासाठी धर्माधिकारी या नवीन पदवीने पुरस्कृत करण्यात आले होते. भारतातील रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील प्रथम स्थानावरून अध्यात्मिक साहित्याची मोफत सामाजिक सेवा सुरू केली.

१९९६ मध्ये प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९९६ मध्ये पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याना प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आता पर्यंत अशी दोन कुटुंब आहेत ज्यांना एका कुटुंबातील २ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे , मंगेशकर कुटुंब (Mangeshkar family). १९९७ साली गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) याना हा पुरस्कार मिळाला होता तर २०२० साली आशा भोसले (Asha Bhosle) यांना देखील पुरस्कारदेण्यात आला होता. तसेच २००३ साली अभय बंग आणि राणी बंग याना देण्यात आला होता. आणि त्यानंतर २००८ साली नानासाहेब धर्माधिकारी याना हा पुरस्कार देण्यात आला होता. तर आता २०२२ चा पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मोदी आज तेच करतायत ना, दारूड्याचे उदाहरण देत प्रकाश आंबेडकरांनी केली मोदींवर टीका

ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात, शिंदे गटावर संजय राऊतांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version