spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, अन्यथा होणार दंडात्मक कारवाई

चारचाकी वाहनांतून मागच्या सीटवर प्रवास करणाऱ्या उद्यापासून (१ नोव्हेंबर) सीट बेल्टची (Seat Belt) सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत.

चारचाकी वाहनांतून मागच्या सीटवर प्रवास करणाऱ्या उद्यापासून (१ नोव्हेंबर) सीट बेल्टची (Seat Belt) सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी पोलिसांनी दिलेली १५ दिवसांची मुदत दिली होती. आज ती मुदत संपत आहे. सीटबेल्ट बसवले नसल्यास उद्यापासून दंडात्मक कारवाई होणार आहे.

सीटबेल्ट वापरल्यामुळे अपघातात मृत्यूची शक्यता ४५ टक्क्यांनी कमी होते. सायरस यांच्या अपघातामुळे सरकारने मागे बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नसेल तर अलर्ट वाजला जाईल. ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला नाही तर त्यासाठी दंडाची तरतूद आहे. मात्र मागे बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंडही भरावा लागणार आहे. हे सर्व कारसाठी लागू होणार आहे.

कारच्या मागील आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक असेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ च्या कलम १९४ (ब) (१) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसंच सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यासाठी १ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी या नियमाला विरोध दर्शवला आहे. “काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात. त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो. काळी-पिवळी टॅक्सीचालकांना चार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र पाठीमागे तीन प्रवासी बसत असल्याने तसंच कार उत्पादकांनी मागच्या दोनच सीटना सीट बेल्टची सुविधा दिल्याने तिसरा प्रवासी सीट बेल्ट लावू शकत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी टॅक्सीची खासगी कारसोबत तुलना करु नये, असं मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाहतूक विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हे ही वाचा :

Maharashtra Politics : ‘वर्षा’ वर तब्बल अडीच तास बैठक; बच्चू कडू-रवी राणा वाद मिटला?

गुजरातमध्ये मच्छू नदीत केबल पूल पाण्यात कोसळला; तीनशेहून अधिक नाकरीक पाण्यात

मंत्री संदिपान भुमरेंनी केली घोषणा; पैठणमध्ये वारकऱ्यांसाठी पहिली स्वतंत्र बँक होणार सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss