आरे वृक्षतोड प्रकरणी उद्या कोर्टात सुनावणी

एमएमआरसीकडून कोर्टाला सांगण्यात आले की, कारशेडमधील एकही झाड एमएमआरसीने कापले नसून फक्त गवत आणि झुडपे कापली आहेत

आरे वृक्षतोड प्रकरणी उद्या कोर्टात सुनावणी

Aarey Case Hearing

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 च्या कारशेड आणि आरे कॉलनीतील झाडे तोडण्याविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती, तसेच कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

आरे कॉलनीतील कामावरील बंदी उठवल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कारशेडच्या परिसरात बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आरेतील कारशेडशी संबंधित सर्व याचिकांवर ५ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकाही झाडाला हात न लावण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी, एमएमआरसीकडून कोर्टाला सांगण्यात आले की, कारशेडमधील एकही झाड एमएमआरसीने कापले नसून फक्त गवत आणि झुडपे कापली आहेत. पण, एमएमआरसीच्या या स्पष्टीकरणावर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील सुनावणी बुधवारी होणार असून, या प्रकरणाचा न्यायालयाच्या संदर्भ यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता बुधवारी न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version