Kullu Paragliding Accident कुल्लू येथे पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

Kullu Paragliding Accident कुल्लू येथे पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

कुल्लू जिल्ह्यातील डोभी पॅराग्लायडिंग साइटवर पॅराग्लायडिंग दरम्यान झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. (Maharashtra tourist dies while paragliding). शनिवारी संध्याकाळी उळी खोऱ्यातील देवगड ग्रामपंचायतीजवळील भाटगरण येथे हा अपघात झाला. (paragliding accident in kullu). या घटनेतील मृताचे नाव सूरज संजय शाह (30) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांच्या एका मित्राने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार, त्यांची एक महिला मैत्रिण शाह यांच्या आधी पॅराग्लायडिंग राईडवर गेली आणि सुरक्षितपणे जमिनीवर आली. पुढे, शाह यांना राईडवर नेण्यात आले आणि टेकऑफ केल्यानंतर लगेचच ते सुमारे 300-400 फूट उंचीवरून जमिनीवर पडले.

हेही वाचा : 

Bomb Cyclone अमेरिकेत भर ख्रिसमसमध्ये ‘बॉम्ब चक्रीवादळा’चा कहर, ४८ डिग्री तापमानात अठरा जणांचा मृत्यू

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच कुल्लू पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पर्यटकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी दिली. रविवारी या पर्यटकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पर्यटकाच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे. कुल्लू पोलिसांनी या अपघाताच्या तपासा दरम्यान पोलिसांनी पायलट विमल देव यांना अटक केली आहे आणि त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 336 आणि 304A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version