spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जाम, दोन तास वाहतूक बंद

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातला एक मोठा आणि महत्वाचा महामार्ग मानला जातो. रोज या महामार्गावर हजारो पेक्षा जास्त गाड्यांची रहदारी असते. राजधानीला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्यानं दिवसभर सतत या महामार्ग गाड्यांनी गच्च भरलेला असतो. आठवड्याच्या अखेरीस दोन- तीन तासांची वाहतूक कोंडी अनेकदा पाहाला मिळते. परंतु आज जाणीवपूर्वक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन तास बंद ठेवण्यात आला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आयटीएमएस प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठी आज द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे.

भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे ; कीर्तिकुमार शिंदे

आयटीएमएस प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हरहेड ग्रॅंटी. तीच उभारण्यासाठी आज दुपारी १२ ते २ दरम्यान हा ब्लॉक घेतला जात आहे. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम सुरू होत आहे. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.या महामार्गामुळं वाहतूक जितकी सुकर झालीय तितकंच यावर होणाऱ्या अपघातांमुळं मार्ग नेहमी चर्चेत असतो. सतत महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींना विनंती

आयटीएमएस सिस्टिम नेमकी काय आहे ?

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे केलं जाणार. या प्रमाणालीमध्ये आधुनिक प्रकारे ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करताच क्षणी प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येईल. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. ३९ ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत.

पारंपरिक आणि तुमच्या डाएट कंट्रोलमध्ये ठेवणारे पौष्टिक मोदक

Latest Posts

Don't Miss