Train Accident : रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं,वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरले

Train Accident : रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं,वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरले

वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरले असलायची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल रात्री ११ वाजून २० मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे ऐन दिवाळीच्या दिवशी प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा : 

IND vs PAK T20 World Cup 2022 : भारत जिंकला ! पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी अभूतपूर्व जल्लोष

आज लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने तब्बल दोन वर्षांनी देशभरात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. त्यामुळे उत्साहही तसाच आहे. अशातच ऐन दिवाळीच्या दिवशी मालगाडीचे डबे घसरल्यानं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक गाड्या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या दुर्घटनेमुळे नागपूर मुंबई मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे. तुम्हीही या रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक पाहा आणि मगच प्रवासासाठी बाहेर पडा.

Diwali 2022 : लक्ष्मीपूजन कसे केले जाते…

कोणत्या महत्वाच्या गाड्या वळविण्यात आल्यात?

पुणे हटीया एक्सप्रेस ही चांदुर बाजार नरखेड मार्गे
अहमदाबाद पुरी एक्सप्रेस
शालिमार एक्सप्रेस
हावडा सीएस एमटी एक्सप्रेस

तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी…; क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केले ट्विट

Exit mobile version