Nitin Gadkari : वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा, ‘या’ तारखेपासून होणार ६ एअरबॅग्ज अनिवार्य

Nitin Gadkari : वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा, ‘या’ तारखेपासून होणार ६ एअरबॅग्ज अनिवार्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ते सुरक्षा, लोकांचा सुरक्षित प्रवास यावर जोर देत आहेत. त्यासाठी ते नवनवीन नियम लागू करत आहेत. आता गडकरींनी पुन्हा एकदा प्रवासी वाहनांमध्ये ६ एअरबॅग्स देणं अनिवार्य करण्याबाबत चर्चा केली. गडकरी लोकसभेत बोलत म्हणाले होते. की, प्रवासी कार्समध्ये मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेला देखील सरकारने प्राधान्य द्यायला हवं. लोकसभेत गडकरी म्हणाले की, सध्या भारतात कार्समध्ये २ एअरबॅग्स अनिवार्य आहेत.

WhatsApp : व्हाट्सअँप लवकरच आणणार नवीन फिचर

मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी बहुतांश वाहनांमध्ये एअरबॅग्स नसतात. कारमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी देखील एअरबॅग बसवण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून अपघाताच्या वेळी मागे बसणाऱ्या प्रवाशांचा देखील जीव वाचेल. गडकरी यांच्या या प्रस्तावावर केंद्र सरकारने याबाबत निर्णय दिला आहे. वाहन चालकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवाशी कारमध्ये सहा एअरबॅग्ज बंधनकारक करणार असणार आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यानुसार, पुढील वर्षी १ ऑक्टोबर २०२३ पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

हेही वाचा : 

‘गँगस्टाज पॅराडाईज’ रॅपर कुलिओ यांचे वयाच्या५९ व्या वर्षी निधन

गडकरी म्हणाले, मोटार वाहनांची किंमत आणि प्रकार विचारात न घेता त्यातून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांची सुरक्षितता ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा व्यापक आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन ०१ ऑक्टोबर २०२३ पासून पॅसेंजर कार्समध्ये (M-१ श्रेणी) किमान ६ एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभेत गडकरी म्हणाले की, काही वाहन उत्पादक कंपन्या कार्समध्ये ६ एअरबॅग्स अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सातत्याने विरोध करत आहेत. मात्र हा निर्णय केवळ लोकांचा जीव वाचवण्यासाठी घेण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची घोषणा करताना, गडकरी यांनी मार्चमध्ये संसदेत सांगितलं होतं की, सहा फंक्शनल एअरबॅग कारमध्ये फिट केल्याने २०२२ मध्ये १३ हजार लोकांचे जीव वाचले असते. जगभरातील एकूण वाहनांच्या केवळ १ टक्के वाहनं भारतात आहे. मात्र जगभरात रस्ते अपघातात जितके मृत्यू होतात त्यापैकी १० टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. त्यामुळे भारतीय नागरिकांचा रस्ते प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायला हवा.

कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही,गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Exit mobile version