सोसायटीच्या चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू तर, तिसऱ्याचा शोध सुरु

सोसायटीच्या चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू तर, तिसऱ्याचा शोध सुरु

पुण्याहून (पुणे) धक्कादायक घटना समोर येत आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोसायटीच्या (society) चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या २ कामगारांचा (workers) दुर्दैवीरित्या मृत्यू (death) झाल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी दोरीचा आधार घेत दोघांना बाहेर काढलं आहे. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षाकाचा शोध घेण्याचे काम “पीएमआरडीए” अग्निशामक दलाच्या (Firefighters) जवानांकडून सुरू आहे. शुक्रवारी (friday) सकाळी ६ वाजता वाघोली येथे ही घटना उघडकीस आली.

वाघोलीबी(Wagholi) येथे मोझे कॉलेज रस्ता (College Road) येथे सोलांसिया (Solansia)नावाची सोसायटी आहे. या सोसायटीच्या परिसरातील चेंबरमध्ये (chamber) काम करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजता दोन कामगार आले होते. चेंबरमधे २ कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेला सोसायटीचा सुरक्षा रक्षक त्यांना वाचविण्यासाठी गेला, त्यावेळी सुरक्षा रक्षक चेंबर मध्ये पडला. यात दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चेंबरमध्ये तिसऱ्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याचा शोध सुरु आहे.पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले आहे. चेंबर दुरुस्त करण्यासाठी सकाळी कर्मचारी आले होते. दुरुस्तीचं काम सुरु असताना तिघेही चेंबरमध्ये अडकले. ही घटना कळताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोरीचा आधार घेत दोघांना बाहेर काढलं आहे. तिसऱ्या कर्मचाऱ्याचा शोध सुरु आहे.

त्यानंतर तेथे तत्काळ दाखल झालेल्या जवानांनी चेंबर मधून दोघांचे मृतदेह बाहेर काढले, तर सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. मृत्यू पावलेल्या दोन कामगारांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती “पीएमआरडीए” अग्निशामक दलाचे प्विजय महाजन यांनी दिली.

हे ही वाचा :

Yogi Adityanath : लोकसंख्या नियंत्रण कायद्यापासून ते धर्मांतराच्या मुद्द्यावर, यूपीमध्ये भाजप सक्रिय

Diwali 2022 : मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन; राज ठाकरेंनी केलं पत्राद्वारे मुंबईकरांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version