Eknath Shinde : एका ट्वीटमूळे CM एकनाथ शिंदेंना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पहा प्रतिक्रिया

Eknath Shinde : एका ट्वीटमूळे CM एकनाथ शिंदेंना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पहा प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. त्यांनी ट्वीट करत दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ‘आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातला निर्णय हा गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.’ असं म्हटलं आहे. पण मुख्यमंत्री शिंदे याच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत.

“सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये आज जो निर्णय दिला आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. सर्व जाती-धर्मांतील गरीब आणि दुर्बल घटकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातला निर्णय हा गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.”

हेही वाचा : 

अशा विधानांमुळे ‘देवेंद्र फडणवीस’ यांचं नाव खराब होत ; ठाकरेंनी उपमुखमंत्र्यांना केलं लक्ष

याच ट्वीटवरुन नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. यामध्ये सर्व जाती धर्मांचा उल्लेख केला आहे, तो चुकीचा असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हा निर्णय केवळ खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांनाच लागू होतो, असं सांगत काही जणांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पूर्ण निर्णय वाचला नाही. ओबीसी एससी एसटी एनटी यांना आर्थिक दृष्ट दुर्बल घटकांना आरक्षण मिळालेला आहे त्यातून आरक्षण घेता येणार नाही, असंही सांगितलं आहे. तर अनेकांनी राज्यातल्या पोलीस भरती, तसंच MPSC मधून पदं भरण्याची मागणीही सातत्याने लावून धरली आहे.

सत्तारांचे वक्तव्य शिंदेंना भोवल

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल महाराष्ट्रात अक्षरश: रान उठवले आहे. अब्दुल सत्तार यांनी नाहक ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर स्वस्थ बसून देणार नाही, असे विद्या चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.

T20 WC 2022 : टीम इंडियाला सेमीफायनलआधी मोठा धक्का, सराव दरम्यान ‘या’ खेळाडूच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत

Exit mobile version