spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिर आता २२ तास खुले राहणार

कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर राज्यातील सण उत्सव निर्बंधांविना पार पडत आहेत. महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाल्यानंतर विविध मंदिर खुली झाली आहेत.

कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर राज्यातील सण उत्सव निर्बंधांविना पार पडत आहेत. महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाल्यानंतर विविध मंदिर खुली झाली आहेत. यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या दरम्यान असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. २६ सप्टेंबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना होऊन दुपारी १२ वाजता गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येणार आहे. घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेलं तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Temple) आगामी शारदीय नवरात्र उत्सव (Navratri 2022) काळात भाविकांसाठी २२ तास खुले राहणार आहे. प्रशासनाकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

तुळजापूरची तुळजाभवानी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. २६ सप्टेंबर (घटस्थापना) ते ५ ऑक्टोबर (दसरा) या काळात तुळजाभवानी मंदिर २२ तास खुले राहणार आहे. नवरात्र काळात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे मंदिर रात्री १ वाजता उघडले जाणार आणि रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे २२ तास सुरु राहणार आहे. मागील दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध होते. मात्र यंदा पहिल्यांदा कोणतेही निर्बंध नसल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात रंगरंगोटी, साफसफाईसह दुरुस्तीची कामं युद्ध पातळीवर सुरु आहेत. घटस्थापनेपूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचं नियोजन आहे. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सवास २६ सप्टेंबरला घटस्थापनेपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापना ते अश्विनी पौर्णिमा असे १५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सरासरी २ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने तयारी सुरु केली आहे.

हे ही वाचा:

India vs Australia 1st T20 : उमेश यादवने ‘या’ दोन खेळाडूंचे वाढवले टेन्शन

राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss