स्कूल बसला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

अथणी येथे कॉलेज बस-टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. स्कूल बस आणि ट्रक (School Bus and Truck Accident) यांच्यात समोरासमोर असा हा अपघात झाला आहे.

स्कूल बसला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

अथणी येथे कॉलेज बस-टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. स्कूल बस आणि ट्रक (School Bus and Truck Accident) यांच्यात समोरासमोर असा हा अपघात झाला आहे. या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहाहून अधिक विद्यार्थींनी जखमी झाल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला. अपघातात स्कूल बस आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.

अथणीहून स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन बनजवाड येथे निघाली होती. त्यावेळी प्लास्टिक पाईप भरून नेणाऱ्या ट्रकची आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाली. मिरज-विजापूर रस्त्यावर शनिवारी (ता. २०) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यात वीस विद्यार्थिनी जखमी असून पाच गंभीर जखमींना मिरज येथे हलविण्यात आले आहे. रघुनाथ औताडे (वय ४०, रा. कोडगनूर, ता. अथणी) असे मयत बस चालकाचे तर मलिकसाहेब मुजावर (वय २३, कलमडी ता. तिकोटा, जि. बागलकोट) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनी बसमधून प्रवास करत होत्या. अपघात झाल्यावर विद्यार्थिनी घाबरून गेल्या होत्या. यावेळी बसमध्ये अडकून पडलेल्या एका विद्यार्थिनीला अपघातस्थळी जमलेल्या लोकांनी बाहेर काढले. अपघातस्थळी विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग आणि जेवणाचे डबे विखुरले होते. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये दोन्ही चालक जागीच ठार झाले. बसमधून ७० विद्यार्थिनी प्रवास करत होत्या. त्यातील वीस जणी जखमी झाल्या आहेत. पाच विद्यार्थिनी गंभीर असल्याने उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. अपघात स्थळी गर्दी झाली असून मदत कार्य सुरू आहे. बसमधून विद्यार्थिनी प्रवास करत असल्याने त्यांच्या पालकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या मुली सुरक्षित असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. मात्र दोन्ही चालक ठार झाल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

हे ही वाचा :-

दहीहंडी उत्सवात मुंबई-ठाण्यासह १०० हून अधिक गोविंदा जखमी तर, एकाचा मूत्यू

दहीहंडी उत्सवात मुंबई-ठाण्यासह १०० हून अधिक गोविंदा जखमी तर, एकाचा मूत्यू

 

 

Exit mobile version