spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray Birthday Banner : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत जोरदार बॅनरबाजी, भावी मुख्यमंत्री…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह संपूर्ण राज्यभरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray Birthday Banner : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह संपूर्ण राज्यभरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत मोतोश्री परिसरात तुफान बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच या बॅनर्स वरून मजकूर देखील आज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अकोला, बुलढाणा, सांगली, पुणे, हिंगोलीसह राज्यातील विविध जिल्ह्यात भावी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी बॅनर्स राज्यभरात शिवसैनिकांकडून लावण्यात आली आहेत. यातील अनेक बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला असून राज्यातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे दिसून येत आहे. तर बेशक संघर्ष के हमारे दिन लंम्बे हैं, पर हमारे हौसले भी बूलंद हैं, असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे

आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीच्या बाहेर ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या रांगाच रांगा आहेत. तर वांद्रे परिसरातील मातोश्री परिसरात उद्धव ठाकरे यांनाच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बनवायचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय, अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. तसेच सांगलीमध्येही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार बॅनर झळकत आहेत. यातील एका बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी हा बॅनर लावला आहे. तसेच मुंबईतील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या झळकणारा एक बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील चौकाचौकात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यातच इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकणाऱ्या एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “बेशक संघर्ष के हमारे दिन लम्बे हैं, पर हमारे हौसले भी बूलंद हैं…” अशा स्वरुपाचा आशय या बॅनरवर झळकताना दिसत आहे. त्यासोबतच यावर महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असेही लिहिण्यात आले आहे.

सांगली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी हे बॅनर झळकताना दिसत आहेत. यात उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने सध्या या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन कडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Uddhav Thakeray Birthday: रश्मी-उद्धव ठाकरे यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? जाणून घ्या हा प्रेमप्रवास…

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे “धर्मवीर-२” चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले; निर्मात्यांचा अनोखा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss