Uddhav Thakeray Birthday: रश्मी-उद्धव ठाकरे यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? जाणून घ्या हा प्रेमप्रवास…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज २७ जुलै रोजी ६४ वा वाढदिवस आहे. २७ जुलै १९६० रोजी जन्मलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा हाती घेतला.

Uddhav Thakeray Birthday: रश्मी-उद्धव ठाकरे यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? जाणून घ्या हा प्रेमप्रवास…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज २७ जुलै रोजी ६४ वा वाढदिवस आहे. २७ जुलै १९६० रोजी जन्मलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा हाती घेतला. उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीमध्ये रस असूनसुद्धा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात शिवसेना नेते, शिवसेना प्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी केला. राजकारणाप्रमाणे त्यांचं खाजगी आयुष्य देखील तितकेच रंजक आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या खाजगी आयुष्यातील काही क्षण जाणून घेऊयात.

राजकारणात येण्यापूर्वी उद्धव ठाकरे पर्यावरणाची आवड जोपासत होते. तसेच निसर्ग आणि वन्यप्राण्यांचे फोटो काढण्याची त्यांना आवड होती. ते पर्यावरण प्रेमीबरोबरच उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची त्यांना फार आवड असून यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी काढलेल्या वन्यप्राण्यांचे फोटो बघून आपल्याला त्याची प्रचिती येतच असेल. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या यशाच्या वाटचालीत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची महत्वाची भूमिका आहे. रश्मी ठाकरे या प्रत्येक परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीरवणे उभे राहतात. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली भेट कशी झाली याचेही काही किस्से आहेत.

रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं माहेरचं आडनाव पाटणकर आहे. त्या १९८७ मध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरी करत होत्या. नोकरी करत असताना त्यांची राज ठाकरे यांची बहिण जयवंती ठाकरे यांच्याशी मैत्री झाली. जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घालून दिली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि नंतर ते प्रेमात बदलले. दोघांची मने जुळल्यावर १३ डिसेंबर १९८८ रोजी रश्मी आणि उद्धव ठाकरे विवाहबंधनात अडकले. रश्मी आणि उद्धव यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आहेत. तर त्यांचा दुसरा मुलगा तेजस हा राजकारणापासून दूरच आहे.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version