Ambadas Danve यांच्या निलंबनावर Uddhav Thackeray संतप्त, सूडबुद्धीने कारवाई केल्याचे आरोप

Ambadas Danve यांच्या निलंबनावर Uddhav Thackeray संतप्त, सूडबुद्धीने कारवाई केल्याचे आरोप

शिवसेना उबाठा विधानपरिषद आमदार आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना प्रसाद लाड (Prasad Lad)  यांना केलेली शिवीगाळ भोवली असून आज (मंगळवार, २ जून) विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. तसेच त्यांना पाच दिवसांसाठी विधान भवन (Maharashtra Vidhan Bhavan) परिसरात फिरकण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली . यावेळी त्यांनी अंबादास दानवे यांच्या व्यक्तव्याबद्दल माफी मागत, “सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या प्रचारात माता भगिनींचा जो अपमान केला, बहीण भावाच्या नात्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर ते माफी मागणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

आज (मंगळवार, २ जून) विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावर निर्णय घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसासाठी निलंबित केले आहे. तसेच निलंबन पूर्ण होईपर्यंत विधानभवन परिसरात फिरकण्याससुद्धा अंबादास दानवेंवर बंदी घालण्यात आली आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “अंबादास दानवे यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली. त्यांनी जो शब्द वापरला त्याबद्दल मी माता भगिनींची माफी मागतो. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या प्रचारात माता भगिनींचा जो अपमान केला, बहीण भावाच्या नात्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर ते माफी मागणार का? एका भगिनींवर अन्याय केल्यावर आम्ही ज्याला मंत्रिमंडळातून काढलं तो व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात आहे. सुप्रिया सुळे यांना शिव्या घालणारा तुमच्या मंत्रिमंडळात आहे, त्यावर काय बोलणार?”

ते पुढे म्हणाले, “अंबादास दानवे यांचे निलंबन झाले. पण त्यावर चर्चा व्हायला हवी होती. त्यावर एकतर्फी निर्णय झाला. एका कुणाकडून तरी निर्णय झाला आणि तसा निर्णय झाला. अंबादास दानवेंनी माफीची संधी द्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. महाराष्ट्रातील जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. विधानपरिषदेमध्ये आम्हाला मिळालेल्या यशानंतर हि सूडबुद्धीने कारवाया करण्यात आली आहे. राज्यातील मूळ मुद्दे बाजूला ठेवून त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.”

“संसदेत झालेल्या गोष्टींवर राज्यात ठराव आणला जात होता. त्याचा काही संबंध आहे का? असे दानवे यांनी विचारलं. हिंदुत्त्वाचा अपमान कुणीही करू शकत नाही. ते सहनही करणार नाही. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही असं राहुल गांधी नाही म्हणाले होते. अपुऱ्या माहितीच्या आधारे हा ठराव आणला जात होता,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Rahul Gandhi यांचे PM Narendra Modi यांना पत्र, NEET घोटाळ्यावर चर्चा करण्याचे केले आवाहन

राहुल गांधींच्या ‘हिंदुत्वा’बाबतच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version