Uddhav Thackeray यांच्या दोन जाहीर सभा, आजचे टीकास्त्र कोणावर?

Uddhav Thackeray यांच्या दोन जाहीर सभा, आजचे टीकास्त्र कोणावर?

विधानसभेच्या निवडणुकीची जंगी तयारी आता सगळीकडेच पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. मागच्या महिन्यामध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी तसेच छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून सकाळी दहा वाजता मुंबईतून खासगी विमानाने ते शिर्डीला रवाना होणार आहेत. अकरा वाजता शिर्डी (Shirdi) संस्थान येथे श्री साईबाबांचे दर्शन उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी ते शिर्डीहून वैजापूरकडे जाणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाकडून दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांचे प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांची सभा सुद्धा होणार आहे. यावेळी भाजप(BJP)चे काही मोठे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांचा दौरा होत असल्याने उद्धव ठाकरे आज कोणाबद्दल बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा होत असलेल्या दोन्ही मतदार संघात शिवसेनेत बंडखोरी झाली होती. उद्धव ठाकरे हे दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी वैजापूरहून पैठणला रवाना होणार आहेत त्यासोबतच सव्वाचार वाजता त्यांचे पैठण येथे आगमन होणार आहे. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्यानंतर उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा आयोजित करण्यात आली आहे. संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन असलेले सचिन घायाळ हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता उद्धव ठाकरे पैठणवरून चिकलठाणा विमानतळाकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर साडेसहा वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होणार असून खासगी विमानाने उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होणार आहेत.

Exit mobile version