आंगणेवाडीच्या यात्रेसाठी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

संपूर्ण कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची (Anganewadi Bharadi Devi) सर्वत्र ख्याती आहे.

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

संपूर्ण कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची (Anganewadi Bharadi Devi) सर्वत्र ख्याती आहे. कोकणातील (Konkan) प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या (AanganeWadi) भराडी देवीची (Bharadi Devi) यात्रा दिनांक २ मार्च २०२४ ला होत आहे. या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर अज्ञाताने फाडल्याचं चित्र समोर आलं आहे.

उद्या पासून या देवीची यात्रा सुरु होत आहे. यानिमित्त उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हात भराडी देवीच्या यात्रेला येत आहेत. या पार्श्भूमीवर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, भराडी देवीच्या मंदिराजवळील कमानीवरील मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे लावलेले बॅनर अज्ञात इसमाने फाडले आहेत. गेल्या वर्षी देखील मुख्यमंत्र्याचे बॅनर फाडण्यात आले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे म्हणून एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत ‘भराडी देवी’ विराजमान झालेली आहे. इथे भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं. संपूर्ण कोकणवासी त्याच सोबत मुंबईत राहणारे चाकरमानी या आंगणेवाडीच्या जत्रेची आतुरतेने वाट बघत असतात. तर मुंबईसह संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोवा व कर्नाटकमधील भाविकही मालवणमधील भराडी देवीच्या जत्रेला येतात. देवीच्या दर्शनासाठी अगदी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. महाराष्ट्रातले अनेक राजकिय नेते, मराठी अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात.

हे ही वाचा:

सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version