spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेत होणार महत्त्वाचे बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज आणि उद्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे मुंबईती काही प्रमुख वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले असून काही भागांतील वाहतूक संथगतीनं सुरु राहणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. या दौऱ्यात ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार असून, भाजपातील काही प्रमुख नेत्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शनही ते घेणार आहेत. तसेच शहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) परिपत्रक काढून अतिमहत्वाची व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान 4 आणि 5 सप्टेंबर, 2022 रोजी काही भागांतील रस्त्यांवरील वाहतूक संथ राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

अमित शाह आपल्या मुंबई दौऱ्यात लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. त्यामुळे लालबागमध्येही वाहतूक संथ गतीनं होणार आहे. लालबागमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी आणि व्हिव्हिआयपी (VVIP) उपस्थिती लावतात. त्यामुळे बऱ्याचदा या मार्गांमध्ये आणखी काही बदल केले जातात. मुंबईतील काही भागातील रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने होईल, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

  • रविवारी 4 सप्टेंबर रोजी सहार, वांद्रे, वरळी सी लिंक, हाजीअली, केम्स कॉर्नर, बाबुलनाथ आणि मलबार हिल परिसरात वाहतूक संथ होणार आहे.
  • सोमवार, 5 सप्टेंबर रोजी मलबार हिल, बाबुलनाथ, केम्स कॉर्नर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन आणि लालबाग परळ, लोटस जंक्शन, वरळी डेअरी, सी लिंक, लिलावती जंक्शन परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु असणार आहे. तसेच, मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरिन लाईन्स आणि रिगल जंक्शन कुलाबा परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु राहिल. त्याचप्रमाणे मरोळ ते पवई दरम्यानच्या परिसरातही वाहतूक संथ होणार आहे.
  • तसेच, दादर, माहीम, सायन, माटुंगा, परळ, लालबाग, भायखळा येथील काही ठिकाणांवरील वाहतूक पर्यायी ठिकाणांवरुन वळवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसमध्ये पडणार फूट; अशोक चव्हाणांसोबत 15 आमदार सामील होणार भाजपमध्ये?

महानगरपालिकेच्या धोरणामुळे शिंदे गटाला घ्यावी लागणार माघार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss