अवकाळी पावसाचा धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, द्राक्ष उत्पादक संकटात

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, द्राक्ष उत्पादक संकटात

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांची वाहून गेली आहेत. तसेच राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात ढगाळ तर काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काढणीला आलेली सर्व पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानं समोर अनेक संकट उभी राहिली आहेत. द्राक्ष बागायतदारांनाही याचा फटका बसला आहे.

यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडला आहे. त्याचा मोठा शेती पिकांना बसला आहे. जोरदार अवकाळी पावसाने शेतातील हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कासारबेहळ येथील शेतकरी गजानन रामराव करे यांच्या शेत सर्वे नंबर 124 मधील दोन एकरमधील अवकाळी पावसामुळे हरभऱ्याची मोठे नुकसान झाले होते, त्या पावसामुळे रोग आल्यामुळे आणि कृषी विभागाचा पंचनामा झाला नाही. त्यामुळे हरभरा पिकावर अखेर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोसायटीचं कर्ज घेतले, घरातील दागिने सावकाराकडे गहाण ठेऊन शेतीसाठी पैसे उभे केले होते. पण अवकाळी पावसामुळे सगळीकडे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेले पीक मळणीसाठी शेतात कापून ठेवले असताना भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्यानं भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात वर्धा जिह्ल्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड परिसरात शेतकऱ्यांचा शेतमाल पोहचत नाहीय. मुळे येथे शेतमालाची आवक मंदावली आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजार समितीमध्ये आणणे शक्य नाही. त्यामुळेच वर्धा बाजार समिती परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे द्राक्षाचे घड कुजू लागले आहेत. तसेच ते घड काढून टाकण्याची वेळ आली आहे. तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकांना बसला आहे.

हे ही वाचा:

ठाण्यातील कासारवडवली आनंदनगरमध्ये तरुणाची तलवारीने वार करून हत्या

LIFESTYLE: HAIR DRYER वापरताना ‘ही’ काळजी घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version