Maharashtra News ब्रिटनकडून शिवरायांच्या तलवारीसोबत वाघनखं राज्यात परत येणार

Maharashtra News ब्रिटनकडून शिवरायांच्या तलवारीसोबत वाघनखं राज्यात परत येणार

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार तसेच शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) विजापूरच्या सरदार अफझलखानाला मारलेली वाघनख ब्रिटनकडून मागवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) मंगळवारी सकाळी या संदर्भात ब्रिटनच्या सुनक सरकारशी केलेला पत्रव्यवहार पत्रकारांना जाहीर करण्याची शक्यता आहे. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेल्या तलवारीशिवाय शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनख (वाघाच्या पंज्यासारखे शस्त्र) देखील शोधण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी केली आहे.

हेही वाचा : 

Mahaparinirvan Din : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीम सैनिकांना चैत्य भूमीवर जाऊन केलं मार्गदर्शन

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवरायांनी वापरलेले वाघ नखं पुन्हा मिळावेत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्याशी चर्चा सुरू आहे. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी वाघ नखं राज्यात परत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच शिवरायांनी वापरलेली ही वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये असून याआधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

शिवराज्याभिषेक दिनाला (Shivrajyabhishek din) २०२४ साली ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच ६ जून २०२४ हा संकल्प आणि शपथ दिवस असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत. शिवरायांनी वापरलेली ही वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये आहेत. या आधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Mahaparinirvan Din : ६६ व्या महानिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर दाखल

शिवकालीन इतिहासात प्रतापगडाच्या (Pratapagad) पायथ्याशी झालेल्या अफजलखान वधाच्या घटनेला मोठे महत्त्वं आहे. या घटनेचा दाखला देत आजही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गोडवे गायले जातात. त्यामुळे या घटनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत शिवप्रेमींमध्ये कुतूहल आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-फडणवीस सरकारने शिवरायांची वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Christmas 2022 जाणून घ्या नाताळ विषयी थोडक्यात माहिती

Exit mobile version