spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Vande Bharat Express ला इगतपुरीत नो स्टॉप, तर नाशिकला फक्त दोनच मिनिट स्टॉप

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ला आज हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ला आज हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस हि मुंबई सीएसटीवरून निघणार आहे आणि नाशिकला फक्त दोनच मिनिटे थांबणार आहे. हि वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी धावणार आहे. इगतपुरीला हि एक्सप्रेस थांबणार नाही त्यासाठी प्रवासांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) ते शिर्डी (Shirdi) धावणारी वंदे भारत एक्सप्रेस याचा शुभारंभ आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस सीएसटी ते शिर्डी हा मार्ग ५ तास २० मिनिटामध्ये पार करणार आहे. तर नाशिक रोड हे अंतर २ तास ३७ मिनिटात पार करणार आहे. परंतु हि एक्सप्रेस इगतपुरीला थांबणार नाही थेट नाशिकलारोडला थांबणार आहे. परंतु हि एक्सप्रेस नाशिक रोडला फक्त २ मिनिटे थांबणार असल्याने प्रवाशांना उतरण्यासाठी सोयीस्कर होणार नाही असे चित्र दिसत आहे.

एखादी वंदे भारत एक्सप्रेस हि नाशिकला सुद्धा मिळावी अनेक दिवसापासून रेल्वे प्रवाशांनी मागणी केली आहे . परंतु मुंबई ते शिर्डी मार्गावर वंदे भारत सुरु होत आहे त्यामुळे नाशिकरांचे काही प्रमाणात स्वप्न पूर्ण होत आहे. दुसरीकडे या गाडीसाठी असलेले तिकिटाचे दर देशील नाशिककराना कितपत परवडणारे असणार आहे आणि त्यांना किती प्रवासी प्रतिसाद देणार आहेत अशी शंका उपस्तिथ होत आहे. मुंबई ते शिर्डी हे अंतर ३४३ किलोमीटरचे अंतर आहे. हि एक्सप्रेस सकाळी सव्वा सहा वाजता मुंबई सीएसटीवरुन सुटणार आहे. आणि हि गाडी दुपारी शिर्डीला साडेअकरा वाजता पोहोचणार आहे. त्या आधी वंदे भारत एक्सप्रेस नाशिकला सकाळी साडे आठ च्या दरम्यान पोहोचेल.

सीएसटीवरुन सुटणारी हि वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे, नाशिक आणि मनमाडला थांबणार आहे. त्यामुळे इगतपुरीतील प्रवाशांना या गाडीचा आनंद घेता येणार नाही. इगतपुरीतील प्रवाश्याना या गाडीचा आनंद घेण्यासाठी ठाण्याला किंवा दादर येण्या साठी नाशिकहून गाडीत बसता येईल. कसारा घाटातून गाडीची यशस्वी चाचणी झाली आहे. त्यामुळे डबल इंजिनची गरज नसल्याने वेळ वाचणार असे सांगितले आहे. वंदे भारत एक्सप्रेस हि राजधानी मुंबईला एक वारसा असलेले तीर्थक्षेत्र नाशिक त्रंबकेश्वर आणि शिर्डी या शहरांना जोडणारी ट्रेन आहे. कसारा घाटामध्ये बँकर (Banker) शिवाय ३७ मीटर पेक्षा एक मीटर उंच चढणारी पहिली ट्रेन आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांचा प्राण हा पाच तास वीस मिनिटात पूर्ण होणार आहे.

हे ही वाचा : 

जाणून घ्या आत्तापर्यंतचे Maharashtra Bhushan पुरस्काराचे मानकरी

मोठी बातमी! आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर, ‘टाईम महाराष्ट्र’ने आधीच दिल होत वृत्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss