महाराष्ट्रावर सूड उगवणाऱ्या सरकारने मागील दहा वर्षांत….मराठीच्या मुद्दयावर Varsha Gaikwad संतापल्या

महाराष्ट्रावर सूड उगवणाऱ्या सरकारने मागील दहा वर्षांत….मराठीच्या मुद्दयावर Varsha Gaikwad संतापल्या

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) आज २२ जुलै २०२४ पासून सुरू झाले आहे. तर उद्या २३ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प (Budget) सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन विक्रमी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज दिनांक २२ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आजपासून सुरू झालेले संसदेचे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये एकूण १९ बैठका होणार आहेत. आजपासून सुरु झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मराठी भाषेबाबत मुद्दा उपस्थित केला.

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…’ ‘अमृतातेहि पैजा जिंके’ अशी महती असलेल्या माय मराठीला (Marathi Language) अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत आवाज उठवला आणि मोदी सरकारच्या याबद्दलच्या उदासीनतेबाबत खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी निषेध व्यक्त केला. मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याबद्दलचा प्रस्ताव गेल्या १० वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित आहे. मात्र यावर अद्याप मोदी सरकारने कोणतीही पावले उचललेली नसल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यात काँग्रेस (Congress) चे सरकार असताना माय मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी मराठीच्या समृद्ध इतिहासाचा सबळ पुरावा देणारा तज्ञांचा अहवाल ११ जुलै २०१४ रोजी केंद्राकडे सादर केला होता. मात्र या अहवालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व महाराष्ट्रावर सूड उगवणाऱ्या त्यांच्या सरकारने मागील दहा वर्षांत काहीही निर्णय घेतला नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या याच मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दलच्या द्वेषाची खबर घेतली, त्यांना चांगलाच धडा शिकवला. यातून या सरकारने काहीतरी बोध घ्यावा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्वरित जाहीर करावा ही काँग्रेस (Congress) ची मागणी असल्याचे मत खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मांडले.

हे ही वाचा:

Mumbai उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून ‘इतक्या’ कोटींची तरतूद – Mangal Prabhat Lodha

Balasaheb Thackeray यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार?: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version