वसईत घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

दरड कोसळून एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय.

वसईत घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

वसईत घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत आज ही पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर सखल भागात पाणी साचले आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. वसई येथील राजवलीच्या वाघरल पाडा परिसरात एका घरावर दरड कोसळली आहे. दरड कोसळून एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. त्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. घरात अनेक लोक अडकले असून घरांचे नुकसान होण्याची भीती आहे. आतापर्यंत दोन जणांची सुटका करण्यात आल्याचं पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

घटनास्थळी स्थानिक पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दल दाखल झाले आणि त्यांनी घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. टेकालेजवळ एम एमआरडीएच्या पाइपलाईन चे काम करण्यात आले होते. दरम्यान कोणतीही संरक्षण भिंत बांधण्यात आली नाही. सकाळी सातच्या आसपास ही घटना घडली. पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पालघर जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळतोय. आज सकाळपासून वसई आणि परिसरात पाऊस जोरदार सुरूच होता. ही घटना टळू शकली असती. एमआरडीएने ने पाईपलाईन चे काम झाल्यावर संरक्षण भिंती बांधली असती तर ही घटना घडली नसती. असं स्थानिकांनी सांगितलं. पाऊस वाढला व दरड कोसळण्याची घटना घडली.

Exit mobile version