Saturday, July 6, 2024

Latest Posts

Vasai Murder Case: तरुणाने भररस्त्यात तरुणीला संपवलं, लोखंडी पान्याने तब्बल पंधरा वेळा डोक्यात केले वार, Devendra Fadnavis यांचे कठोर कारवाईचे निर्देश

वसईमध्ये प्रेमप्रकरणातून भररस्त्यात एका तरुणाने तरुणीची डोक्यात लोखंडी पान्याने वार करून हत्या (Vasai Murder Case) केली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून वसई पूर्वेच्या गेवराई पाडा येथे हि घटना घडली आहे.

वसईमध्ये प्रेमप्रकरणातून भररस्त्यात एका तरुणाने तरुणीची डोक्यात लोखंडी पान्याने वार करून हत्या (Vasai Murder Case) केली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून वसई पूर्वेच्या गेवराई पाडा येथे हि घटना घडली आहे. आरोपीचे नाव रोहित यादव असून मृत तरुणीचे नाव आरती आहे. वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

समाज माध्यमांवर या हत्येचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अंगावर काटा आणणारी दृश्ये चित्रित झाली आहेत. आरोपी रोहितने आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर तब्बल पंधरा वेळा डोक्यात लोखंडी पान्याने वार केले. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. परंतु, कोणीही त्याला अडवायला गेले नाही. मृत तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळापाशीच राहून मृत आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून प्रत्येकालाच राग अनावर झाल्याचे दिसत आहे.

आरोपी रोहीत आणि मृत आरतीचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिन्याभरापूर्वीच या दोघांचेही ब्रेकअप झाले होते. आरोपी रोहित हा बेरोजगार असून आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. हेच संशयाचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे रोहितने भररस्त्यात आरतीची हत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून ते म्हणाले, “वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे.”

हे ही वाचा

शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या भुजबळांना उबाठा गडाचे दरवाजे उघडणार, अजितदादांना गुडबाय!

Loksabha Election 2024: लोकांनी दाखवून दिलं की वातावरण बदलत आहे, Sharad Pawar मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss