विजय ताड यांच्या हत्येचा उलघडा झाला , माजी भाजप नगरसेवक ठरला मुख्य सूत्रधार

विजय ताड ह्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार हा भाजपचा माजी नगरसेवक असल्याचे समोर आले आहे. उमेश सावंत असा सूत्रधाराच्या नाव आहे

विजय ताड ह्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार हा भाजपचा माजी नगरसेवक असल्याचे समोर आले आहे. उमेश सावंत असा सूत्रधाराच्या नाव आहे,परंतु हा गुन्हा नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेला नाही. अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

 

विजय ताड हे देखील भाजपचे माजी नगरसेवक होते . सध्या त्यांच्या खुनाचा तपस पोलीस करत होते ह्या तापसातूनच पोलिसांनी ह्या हत्ये मागच्या सूत्रधाराला पकडले आहे .सूत्रधार उमेश सावंत हा देखील भाजपचा माजी नगरसेवक आहे ह्या खून प्रकरणात एकूण पाच व्यक्तींची नवे पुढे आली होती त्यातील चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे . बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने, आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत. माजी नगरसेवक उमेश सावंत फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. तपासासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी पाच जणांची नावे समोर आली आहेत.मुख्य सूत्रधार फरार असल्यामुळे ह्या हत्येमागचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झाले नाही .

दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली

शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. विजय लंड हत्यांच्यावर हल्लेखोरांनी पहिले गोळ्या झाडल्या नंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली . हा सर्व प्रकार भर दुपारी झाला त्यामुळे सर्व शहरात खळबळ माजली होती. माजी नगरसेवकाचा खून झाल्याने वेगवेगळी अफवा शहरात पसरत होती . सर्व लोक ह्या प्रकरणाचा तपस लवकर लावावा अशी मागणी करत होते. पोलिसांनी देखील तातडीने त्याच्यावर कारवाई केली. दरम्यान, मृत माजी नगरसेवक विजय ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीमध्ये संदीप उर्फ बबलू चव्हाणने त्याच्या साथीदारासोबत आपल्या भावावर गोळ्या झाडून आणि दगड घालून खून केल्याची तक्रार दिली आहे. त्याचबरोबर फिर्यादीमध्ये जत भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख करण्यात आला होता. विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंत यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला होता, असे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता हे समोर आले आहे.

 

Amruta Fadnavis आणि Priyanka Chaturvedi यांच्यात ट्विटर वॉर

शेतकरी जगला तरच राज्य जगेल, राज्यातला शेतकरी हवालदिल, अजित पवार

ठाण्यातील घोडबंदर रोडचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करा, शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची आयुक्तांकडे मागणी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version