spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निवडणूकीचे काम सोपे करून जबाबदारपणा वाढवणारा मतदार संपर्क ॲप – Devendra Fadnavis

दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मतदार संपर्क अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या ॲपचा पहिला प्रयोग गोव्यातील निवडणूकीत केला आणि यामुळे मोठया प्रमाणात फायदा झाला. महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये याची सुरुवात आपण करणार आहोत, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निवडणूकीचे काम सोपे करण्यासोबतच जबाबदारपणा वाढवणारा ‘मतदार संपर्क ॲप’ असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या अ‍ॅपची सगळ्यांना ट्रेनिंग द्यावी लागेल त्यासाठी डॉ. घीलानी लवकर येतील, ते या अ‍ॅपबद्दल ट्रेनिंग देतील. संपर्क ॲपमुळे निवडणूक सोपी होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर (Nagpur) येथे व्यक्त केला. जे कार्यकर्ते म्हणतात, मी खूप काम करतो मात्र आता या ॲपमुळे सगळी माहिती मला मिळणार आहे. यामुले सर्वांची कामं मला कळणार आहेत. डिजिटल युगात या सगळ्या गोष्टी अकाउंटबिलिटी आणणार आहेत. लवकरच संशोधनातून तयार करण्यात आलेल्या या ॲपबद्दल ट्रेनिंग सूरू करु. असे सांगत, माझं टार्गेट लोकसभा आहे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

‘लॉकडाऊन लग्न’मध्ये अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता रमेश परदेशी दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत

कालवा समितीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय, पुणेकरांची पाणीकपात टळली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss