spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kalyan Loksabha मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदारांची आजपासूनच गर्दी

राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० मे २०२४ रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात सोमवारी २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) जाहीर केलेल्या यादीत अनेकांना नावे सापडत नसल्याने उडणाऱ्या गोंधळामुळे मतदानाचा टक्का कमी होऊ नये, यासाठी कल्याण (Kalyan) लोकसभेत नागरिक व सामाजिक संघटनेने एकत्र येत ठिक-ठिकाणी मतदान बूथ लावले आहेत. विशेष म्हणजे उद्या म्हणजेच २० मे रोजी मतदान करताना मतदार यादीत आपले नाव व सदन केंद्र शोधण्यास त्रास होऊ नये म्हणून, १९ मे म्हणजे आदल्या दिवसापासूनच नागरिकांनी या मतदान बुथवर नाव शोधण्यासाठी येण्यास सुरुवात केली आहे.

दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी वाहन व्यवस्था

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

मतदार यादीत नाव तपासून घ्या

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे.

लोकसभा क्षेत्रामध्ये ४८ तास आधी प्रचारास मज्जाव 

मतदान संपण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी तेराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये ४८ तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss