Gram Panchayat Election : आज राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतीत मतदान पार पडला, तर उद्या निकालाचा दिवस

Gram Panchayat Election : आज राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतीत मतदान पार पडला, तर उद्या निकालाचा दिवस

राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत असून आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी आज मतदान होत आहे.

Sharad Pawar : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजपने उमेदवार देऊ नये ; शरद पवार

आज पार पडलेली ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक (Sarpanch Election) ही थेट जनतेमधून होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी १७ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येईल. अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सभापतीपदासाठी आणि उपसभापती पदाची निवडणूक होत आहे. सातही पंचायत समित्यांवर वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. . मात्र, वंचितचे पुर्ण बहूमत असलेल्या सर्वात मोठ्या अकोला पंचायत समितीत भाजपला लॉटरी लागली . कारण एसटी महिला राखीव उमेदवार त्यांच्याकडेच आहे.

हेही वाचा : 

Har Har Mahadev : “भगवा ज्याचा श्वास तो मराठी…” राज ठाकरे ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा एक भाग

विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असे दावे-प्रतिदावे होत आहेत. असे असले तरी सोमवारी मतमोजणीनंतर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे स्पष्ट होणार आहे. शनिवारी निवडणुकीसाठीचे विविध साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदाेबस्त मोठ्या प्रमाणात होता.

NCP : नागपूरमधील ‘रस्त्यांची रांगोळी’ म्हणत राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

Exit mobile version