वारकरी विठुरायाच्या पायी माथा टेकवण्यासाठी आतुर

मागील ११ दिवसांपासून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे आणि या दिंडीला लाखो भाविक पायी वारी करत आहेत.

वारकरी विठुरायाच्या पायी माथा टेकवण्यासाठी आतुर

मागील ११ दिवसांपासून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे आणि या दिंडीला लाखो भाविक पायी वारी करत आहेत. भक्तीमध्ये तल्लीन झालेले वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पाऊले पुढे टाकत आहेत. संत मुक्ताबाई यांच्या बरोबर संत निवृत्तीनाथांची पालखी २ जून रोजी निघालेली आहे. ‘अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी’, अशा असंख्य अभंगांनी पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. काल अंबड इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईची पालखी आज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडत आहे आज अंकुश नगर येथील कारखान्यावर मुक्कामी असणार आहे.

हजारो वारकरी पियू चालले आहेत आणि २ जून पासून निघालेल्या वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा अकरावा दिवस आहे. ज्या ठिकाणी वारी थांबते त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावामधील अनेक वारकरी दिंडीमध्ये सामील होत आहेत. नगर जिल्यामधील राहुरी शहरामध्ये मुक्कामी असलेली संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे राहुरी तालुक्यातील डोंगरगण गावाकडे मार्गस्थ करण्यात आली आहे. त्यानंतर राहुरी येथून निघून पुढे वांबोरी मार्गे मार्गक्रमण करत डोंगरगण गावी मुक्कामी प्रस्थान करण्यात आले आहे. पायी चालणारे वारकरी विठुरायाच्या पायी माथा टेकवण्यासाठी आतुरलेले आहेत.

संत निवृत्तीनाथांची पालखी आज राहुरी येथून पायमार्गाने सडे, वांबोरी या गावावरून जाणार आहे. त्याचबरोबर दुपारचे जेवण वांबोरी ग्रामस्थांकडून दिले जाणार आहे. त्यांनतर आज मुक्कामासाठी संत निवृत्तीनाथांची दिंडी डोंगरगण येथे जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज अंबड येथून मार्गस्थ होणार आहे. दुपारी शहागड येथील रामकृष्ण जगताप यांच्या परिवाराकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यानंतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण अंकुशनगर पाथरशाला गावी असणार आहे.

हे ही वाचा:

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा नवा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

मुंबईतल्या जुहू चौपाटीवर ६ जण बुडाले तर स्थानिक नागरिकाने एकाला वाचवले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version