spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाबे त्याची जोरदार बॅटिंग करण्यास आता सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस हा सुरु झालंच आहे

मुंबई :- राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाबे त्याची जोरदार बॅटिंग करण्यास आता सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस हा सुरु झालंच आहे आणि अश्यातच ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईसाठी ८, ९, आणि १० ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या तीनही दिवशी १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. सध्या कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळं जनजीव विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळं वाहतुकीवनर मोठा परिणाम झाला आहे. रत्नागिरी ते गणपतीपुळे या मार्गावरील वाहतूक देखील पूर्ण प्रमाणात बंद करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यात मोठा पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील ७ ऑगस्ट ते ऑगस्ट या दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता हि वर्तवली जात आहे. तर विदर्भात १० ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात ९ आणि १० ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे.

सध्या राज्याच्या विविध भागांत चांगलाच पाऊस हा कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः मराठवायातील औरंगाबाद, लातूर, नांदेड या सह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसानं चांगली हजेरी लावली आहे.

तर दुसरीकडे देशामध्ये मध्य प्रदेशात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. इंदौर, भोपाळसह अनेक भागात पावसामुळं पाणी साचलं आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणाचा काही भाग, वायव्य उत्तर प्रदेश, उर्वरित ईशान्य भारत, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत पूर्व राजस्थानमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

हे ही वाचा :- 

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी मोदी एक्सप्रेस

Latest Posts

Don't Miss