spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नागपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी

सध्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी रेड अलर्ट केला आहे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट केला आहे.

सध्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी रेड अलर्ट केला आहे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट केला आहे. याचदरम्यान नागपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. नागपूर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्याचबरोबर आजचा दिवस विदर्भासाठी महत्वाचा असणार आहे. आज गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. बांगाच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूर वेध शाळेने हा अलर्ट दिला आहे.

राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. काल दिवसभर ठाणे जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळत होता. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती आहे. असे असताना आता अंबरनाथ-बदलापूर जवळील बारवी धरण देखील जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडणार आहेत आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग होणार आहे. बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये बारवी धरणातून बारवी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत माहिती देण्यात आली आहे.

वर्ध्यामध्ये रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. तब्बल १२ तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामधील यशोदा, भदाडी, वर्धा या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे यशोदा नदीवरील वर्धा – राळेगाव, अल्लीपूर – अलमडोह मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास नदी काठावरील गावात पाणी शिरण्याची भिती असल्यामुळे गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

अश्विनने या खेळाडूला मागे टाकत केला नवीन विक्रम

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध , आंदोलन

गणपती स्पेशल रेसिपी: घरीच बनवा बाप्पासाठी मोदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss