“महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवले तरच विकसित भारत आपल्याला करता येईल” -Devendra Fadnavis

“महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवले तरच विकसित भारत आपल्याला करता येईल” -Devendra Fadnavis

लखपती दीदी संमेलन आज जळगाव येथे सुरु आहे. लखपती दीदी हा उपक्रम नरेंद्र मोदी यांचा एक महत्वपूर्ण असा आशावादी प्रकल्प आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव मध्ये लखपती दीदी संमेलनात (Lakhpati Didi Yojana) सहभागी होणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटप आणि सत्कार करण्यात येणार आहे. केंद्राची ही योजना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत १ कोटी महिला लखपती झाल्यात तर एकूण ३ कोटी महिलांना लखपती करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले आहे. जाणुयात सविस्तर ते नेमके काय म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस नक्की काय बोले ?

“मला आनंद होतोय कि हे लखपती दीदींचं संमेलन हे जळगावात होत आहे. या मातृशक्तीचे आभार आणि कौतुक व्यक्त करतो की मोठ्याप्रमाणात सर्वांनी हजेरी लावली आहे. बेटींबचाव बेटीपढाव पासून ते लखपती दीदी यांमुळे विकसित भारत हा महिलांच्या माध्यमातून होऊ शकतो. असं नरेंद्र मोदी म्हणतात. महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवले तरच विकसित भारत आपल्याला करता येईल. महिलांचा विकास हा फक्त मोदींच्या कारकिर्दीत झालेला दिसतो आहे. २०२९  पासून देशाचा कारभार महिलांच्या हातात देण्याचा विचार केला आहे. मोदींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात नरी सन्मानाचे कार्यक्रम सुरु करण्यात आले. या सर्व योजना महिलांना केंद्रस्थानी ठेऊन केले आहे. महात्राष्ट्र मध्येही महिला मागे राहणार नाही. आज महाराष्ट्रात ७ ५  लाख परिवार हे बचत गट वाढले आहेत. लवकरच हा एकदा २ कोटी च्या घरात जाणार आहे. आपल्या महिला अशा आहेत की शासनाचा एकही पैसा स्वतःकडे ठेवत नाही सूतसमित पार्ट करतात. त्यामुळे महिलांनसाठी सर्वच बँक तयार आहे. नेपाळमध्ये झाला त्यांना मी श्रद्धांजली देतो. यामुळे देशाचं भांडवल वडझण्यास मदत होते आहे. मी जाता जाता जिल्ह्याच्या आनंदाची बातमी देऊन जातो. ती म्हणजे नारपारगिरणा प्रकल्प ही योजना जळगाव मध्ये राबवणार आहोत. ज्यामुळे जळगावच संपूर्ण चित्र बदलणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार आहे. या योजनेला मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेटमध्ये टेंडर काढण्याची मागणीसुद्धा केली आहे. यामुळे जळ्गाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचा हा एक प्रयत्न आहे. वाघूर, पाडस इत्यादींमधून शेतकरीही सूजलाम सुफलाम होणार आहे. “

Exit mobile version