आमचा ठाकरें गटाच्या शिवसैनिकांवर राग नाही – प्रवक्ते नरेश म्हस्के

Naresh Mhaske : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा १६ एप्रिलला नागपूर येथे पार पडणार असून या वज्रमूठ सभेसाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते सभेसाठी नागपूरच्या दिशेने निघाले होते. परंतु प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर या कार्यकर्त्यांचा अपघात झाला.

आमचा ठाकरें गटाच्या शिवसैनिकांवर राग नाही – प्रवक्ते नरेश म्हस्के

Naresh Mhaske : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा १६ एप्रिलला नागपूर येथे पार पडणार असून या वज्रमूठ सभेसाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते सभेसाठी नागपूरच्या दिशेने निघाले होते. परंतु प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर या कार्यकर्त्यांचा अपघात झाला. त्यात दोन जण जागीच ठार झाले. तर काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून जखमी कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व जखमी कार्यकर्त्यांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगानंतर टाईम महाराष्ट्राने शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या सोबत संवाद साधला आहे. मुख्यमंत्रांनी क्षणाचा विलंब न करता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या उपचाराच्यासाठी सूचना दिल्या असल्याचं नरेश म्हस्के यांना विचारे असता, आमचा मुख्यमंत्री हा कार्यकर्त्यांमधला मुख्यमंत्री आहे, दिलदार मुख्यमंत्री आहे. लोकांचे अश्रू पुसणारा, लोकांसाठी सातत्याने धावत जाणारा मुख्यमंत्री आहे. शेवटी ते एकेकाळी आमच्यासोबत कामं करणारे शिवसैनिक होते, त्यांच्यावर वेळ प्रसंग आला तर त्यांच्यासाठी धावून गेलं पाहिजे. आमचा शिवसैनिकांवर कोणताही राग नाही. अडचणीत असलेल्या माणसाला मदत करणं हा आमचा आम्ही धर्म समजतो. त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्यांना मदत केली असल्याचं प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टाईम महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितलं आहे.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या पक्ष बांधणीसाठी स्वतः नाशिकमध्ये आज जाणार आहेत याबद्दल नरेश म्हस्के यांना विचारल्यावर, रश्मी वहिनी बद्दल आम्हाला आदर आहे, रश्मी वहिनी कधीही राजकारणात नव्हत्या यापूर्वी बंद दारा आड त्या राजकारण करत होत्या, संजय राऊत यांना विचारा संजय राऊत रश्मी ठाकरेंविषयी काय काय बोलायचे हे तुम्हा माध्यमांना ही ठाऊक आहे असं म्हणतं नरेश मस्के यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला. त्यांचा पक्ष आहे आणि पक्ष बांधणीसाठी ते मेहनत करणार परंतु याने काही फरक पडणार नाहीये, लोकांच्या लक्षात आलंय यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्ववाद सोडलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचळणीला जाऊन हे लोक बसलेत त्यामुळे किती काही करा शिवसैनिकांचा भ्रमनिरास झालेला आहे. आता त्याच्यातून बाहेर येणं शक्य नाहीये. सर्व लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पाठीशी राहणार असल्याचं प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टाईम महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितलं आहे.

हे ही वाचा : 

विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना

भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत…, जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version