spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जालना विधानसभेसाठी मुस्लिम उमेदवाराची मागणी आपण पक्ष श्रेष्ठींकडे पाठवू – Kalyan Kale

वक्फ बोर्डाच्या अध्यादेशाच्या विरोधात काँग्रेस खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली असल्याची माहिती रजा अकादमीचे जमील मौलाना यांनी दिनांक १४ शनिवार रोजी दिली.

वक्फ बोर्डाच्या अध्यादेशाच्या विरोधात काँग्रेस खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली असल्याची माहिती रजा अकादमीचे जमील मौलाना यांनी दिनांक १४ शनिवार रोजी दिली. वक्फ बोर्डबाबत खासदार कल्याण काळे यांनी भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे मौलाना जमील यांनी खासदार कल्याण काळे यांना लक्ष करत त्यांना फक्त निवडणकीपुरतंच मुस्लिम समाजाचा वापर करायचा होता. निवडून आल्यापासून खासदार काळे एकाही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला भेटले नाहीत. आता थेट ते २०२९ मध्ये दिसतील असा सवाल उपस्थित केला होता. तसेच वक्फ संशोधन बील २०२४ बाबत खासदारांनी आपली भूमिका न मांडल्यामुळे जालन्यात मुस्लिम समाजामध्ये रोष व्यक्त होत होता.

मुस्लिम समाजाचा रोष आपल्याला भविष्यात परवडणारा नाही ही बाब लक्षात आल्याने तसेच प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये मुस्लिम समाजाच्या रोषाबाबत बातम्या प्रसिद्ध होताच खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जालना शहरातील रजा अकादमीचं कार्यालय गाठत मुस्लिम समाजाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्याचबरोबर काँग्रेस पक्ष हा वक्फ बोर्डाच्या २०२४ च्या अध्यादेशाविरोधात ठामपणे उभा आहे, अशी ग्वाहीपण कल्याण काळे यांनी दिली असल्याची माहिती मौलाना जमील यांनी दिली आहे. जालना विधानसभेसाठी काँग्रेसने मुस्लिम समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाची आहे.

यावर प्रतिक्रिया देताना खासदार काळे म्हणाले की, उमेदवारी देणे माझ्या हातात नाही. परंतु मुस्लिम समाजाची ही मागणी आपण नक्कीच पक्षश्रेष्ठीच्या कानावर घालू असे ते म्हणाले. त्याचबरोबर जुन्या जालना भागात मुस्लिमांसाठी हॉस्पिटलची व्यवस्था नसल्याने येणाऱ्या काळात हॉस्पिटलची व्यवस्था करण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, रजा अकॅडमीचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद जमील मौलाना, अब्दुल हफिज पत्रकार, अब्दुल रशीद पैहलवान, गुलाम मेहबूब, शेख माजेद, सय्यद रहीम, शेख अनिस, खलील शेख, सय्यद मोसिन रजवी, मुजम्मिल अख्तर लीडर यांच्यासह मुस्लीम धार्मगुरूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हे ही वाचा:

Team Indiaचा उपकर्णधार Shubman Gill ला ब्रेक, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर? कारण काय…

गणपती विसर्जननिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल, १७ रस्ते वाहतुकीस बंद

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss