spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Palghar च्या Vadhavan Port या प्रकल्पाचे नेमके उद्दिष्ट काय? या प्रकल्पाचा एकूण खर्च किती?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 30 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई आणि पालघरला भेट दिली. प्रधानमंत्री मोदी यांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित केले. त्यानंतर सिडको मैदान, पालघर येथे विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात आले. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पाचा एकूण खर्च रु. 76, 000 कोटी आहे. अति-मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेऊन देशाच्या व्यापार आणि आर्थिक वाढीस चालना देणारे जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांना थेट संपर्क प्रस्थापित करेल, ज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात खोल बर्थ, कार्यक्षम माल हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील. या बंदरामुळे रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात गती मिळेल. यावर भर देण्यात येत आहे. वाढवण बंदर प्रकल्पात पर्यावरणीय परिणाम कमी करण्यावर आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करून शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यावरही भर देण्यात आला आहे. कार्यान्वित झाल्यानंतर हे बंदर भारताची सागरी जोडणी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करेल. देशभरातील या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने 1560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमांमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

360 कोटी रुपयांचा खर्च राष्ट्रीय जहाज दळणवळण आणि सहाय्य प्रणालीचा आरंभही प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत किनारपट्टीवरील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यांत्रिक आणि मोटरयुक्त मासेमारी जहाजांवर टप्प्याटप्प्याने 1 लाख ट्रान्सपॉन्डर्स बसवले जातील. जहाज दळणवळण आणि सहाय्य प्रणाली हे इस्रोने विकसित केलेले स्वदेशी तंत्रज्ञान आहे. मच्छिमार समुद्रात असताना द्विमार्गी दळणवळण स्थापित करण्यात हे तंत्रज्ञान मदत करेल आणि बचावकार्यात मदत करेल तसेच मच्छिमारांची सुरक्षा सुनिश्चित करेल. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अन्य उपक्रमांमध्ये मासेमारी बंदरे आणि एकात्मिक ॲक्वापार्कचा विकास, तसेच रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम आणि बायोफ्लॉक यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब यांचा समावेश आहे. हे प्रकल्प अनेक राज्यांमध्ये राबवले जातील आणि मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी, व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांसाठी उपयुक्त ठरतील. मत्स्य बंदरांचा विकास, सुधारणा आणि आधुनिकीकरण, मत्स्य लँडिंग केंद्रे आणि मत्स्य बाजारपेठेचे बांधकाम यासह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय पायाभूत प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यामुळे मासे आणि सागरी खाद्यपदार्थांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छ परिस्थिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss