spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प म्हणजे काय?, सेमीकंडक्टर प्लाँटची उभारणी, राज्याचे किती नुकसान झालं, जाणून घ्या सविस्तर माहिती

आज संपूर्ण राज्यभरात युवसेना आणि राष्ट्रावादी पक्षाचे आंदोलन सुरु आहे. मुंबई पुण्यासह ठिकठिकाणी राज्य सरकार विरुद्ध युवा सेना आणि राष्ट्रावादीचे कार्यकर्ते पेटून उठले आहे. याचे कारण म्हणजे वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प सध्या महाराष्ट्रात हा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. तायवानची कंपनी फॉक्सकॉन आणि मुंबईतील वेदांत कंपनी मिळून हा प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी गुजरातमध्ये उभारणार अशी घोषणा होताच विरोधकांनी राज्य सरकारची पाळता भुई थोडी केली. परंतु राज्य सरकारने देखील विरोधकांना तोडीसतोड उत्तरे दिले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार असताना हा प्रकल्प जवळपास महाराष्ट्रातच उभारला जाणार होते असे जवळपास निश्चित झाले होते. महाविकास आघाडी सरकार कंपनीच्या संपर्कात होतं आणि यावर्षी जानेवारीमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठकही झाली होती. परंतु आता हा प्लाँट एकेकी गुजरातमध्ये गेला कसा असा प्रश्न विरोधकांन कडून केला जात आहे. कारण या प्रकल्पामुळे महाराष्टाचा मोठा फायदा होणार होता. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली असती, रोजगार प्राप्त झाला असता.

हेही वाचा : 

‘ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो…’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन

परंतु आता भारतीय कंपनी वेदांत आणि तायवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनचा १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्लाँट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. वेदांत आणि फॉक्सकॉन या जॉइंट युनिट राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात १००० एकर क्षेत्रात स्थापित केलं जाईल. या जॉइंट वेंचरमध्ये दोन्ही कंपन्यांची भागीदारी ६० आणि ४० टक्के इतकी असेल. त्या ठिकाणी सेमीकंडक्टर प्लाँट उभारला जाणार आहे.

Asad Rauf : पाकिस्तानचे पंच असद रऊफ यांचे निधन, क्रिकेट जगतावर शोककळा पसरली

आता सेमीकंडक्टर प्लाँट म्हणजे काय आपल्या देशासाठी ते किती उपयुक्त ठरेल ?

सेमीकंडक्टर म्हणजे अर्धचालक असा होतो. याचा वापर करंट नियंत्रित करण्यासाठी केला जातो. सेमीकंडक्टर सिलिकॉनपासून बनवलेले असून ते चिप फॉर्ममध्ये असते. बाजारात असलेल्या प्रत्येक कारला सेमीकंडक्टर वापरलेच जाते. याने कारचे करंट नियंत्रित केले जात असल्याने याशिवाय कारचे हायटेक फिचर्स चालूच शकत नाही. कारला चालता फिरता कंप्यूटर बनवण्यात सेमीकंडक्टरचा वाटा सर्वात मोठा आहे.कारचे विविध फिचर मध्ये याचा वापर केला जातो.

वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने, आज युवासेना होणार राज्यभर आक्रमक

गेल्या वर्षी सेमीकंडक्टरची मोठी टंचाई देशात निर्माण झाली होती. याचा फार मोठा फटका वाहन उद्योगाला बसला होता. सेमीकंडक्टर चीन आणि तैवान येथून आयात केले जातात. या दोन्ही देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात सेमीकंडक्टरचे उत्पादन होणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सवलत योजना आणली होती.

Latest Posts

Don't Miss