spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आरक्षणाच्या मागणीसाठी गावागावात व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे, मनोज जरांगेंच्या सूचना

मराठा आंदोलनाचा वाद आता राज्यभरात सगळीकडे पेटला आहे.

मराठा आंदोलनाचा वाद आता राज्यभरात सगळीकडे पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. मात्र त्यांनी त्यांचे उपोषण ३ मार्चपर्यंत स्थगित केले आहे. आंदोलन स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर ते आता आंतरवली सराटीमध्ये जाणार आहेत. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला काही सूचना दिल्या आहेत.

मनोज जरांगे म्हणाले, आज मी रुग्णालयामधून सुट्टी घेणार आहे. आज आणि उद्या मी आंतरवली सराटीमध्ये राहणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या गावामध्ये धरणे आंदोलन करावे. मराठा समाजाला जर १० टक्के आरक्षण दिलं तर ओबीसी मधून आरक्षण देण्यास काय हरकत आहे. १० टक्के आरक्षण मान्य करा, असे षडयंत्र सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही चालू आहे त्यावर पुढील काही दिवस बारीक लक्ष ठेवा. मराठा आरक्षणासाठी गावागावात व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. कालपासून मराठ्यांनी तालुक्या तालुक्यात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. सर्व नियम पाळून मराठा आंदोलन चालूच राहील. निवडणूक आयुक्त जे नियम आम्हा आंदोलकांना लावणार आहेत, तेच नियम निवडणुकीसाठी लावावे. मी फक्त विद्यार्थ्यांसाठी आंदोलन स्थगित केले आहे. राज्यात कुठेही आमचं आंदोलन सुरु नाही. विद्यार्थीसाठी हे आंदोलन स्थगित केले असून, आडमुठापणा नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतल्यानंतर पोलिसांनीसंचारबंदी लागू केली. संचारबंदी लागू केल्यानंतर मनोज जरांगे माघारी आंतरवली सराटीमध्ये परत गेले. त्यावेळी त्यांची उपोषणामुळे प्रकृती खालावली होती. त्यानंतर महिल्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडून उपचार घेण्यास होकार दिला. दोन तीन दिवसांच्या उपचारानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती सुधारली आहे.

हे ही वाचा:

भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागली आहे, संजय राऊत

Lok Sabha Election 2024 : मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss