राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला? घ्या सविस्तर जाणून

देशभरात ऑगस्ट महिन्यात खूप कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.

राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला? घ्या सविस्तर जाणून

देशभरात ऑगस्ट महिन्यात खूप कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. परतीच्या पावसाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. चांगल्या प्रमाणत पाऊस पडल्यास शेतमालाचे नुकसान होण्यापासून वाचू शकेल. अल निनोचा ( El Nino) प्रभाव मान्सूनवर मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. राज्यातील पावसाचे तीन महिने संपून गेले आहेत तरी मात्र धरणे भरली नाहीत. पण आता सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल का? जर या महिन्यात पाऊस चांगला पडला तरच शेतकऱ्यांना रबी हंगामातील पिक घेता येतील. जसेच जलसाठा पूर्ण क्षमतेने होऊ शकेल. आता हवामान खात्याने आज आणि उद्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पाहुयात कोणते आहेत ते जिल्हा

राज्यभरातील काही जिह्ल्यात शनिवारी आणि रविवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडरा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, नागपूर, अमरावती, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिह्ल्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे –
शनिवारी रात्रीपासून मुंबई आणि पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सगळीकडे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर मुंबई आणि नवीन मुंबईसह सगळीकडे ढगाळ वातावरण तयार झाले असेउण मुंबईच्या काहीभागात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बेलापूर, जुईनगर, नेरुळमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे.

रत्नागिरी –
रायगडमधील खोपोलीमध्ये शुक्रवार पासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे घरात आणि इमारतीमध्ये पाणी शिरले आहे. तर खोपोलीमधील ग्रामीण भागातसुद्धा पावसाने हजेरी लावली आहे. कारमेल स्कूलच्या पाठीमागे मोगलवाडी या भागात पाणी शिरले आहे. रत्नागिरीमध्ये १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. चिपळूणमध्ये पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे. कोकणात १५ दिवस पाऊस न पडल्यामुळे भट शेती संकटात अली होती.पण आता पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा कोकणातील धरणामध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे.

हे ही वाचा:

लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही खास योगासने अधिक फायदेशीर…

डोंबिवलीतील धक्कदायक बातमी रात्री प्रवाशांच्या डोळ्यात स्प्रे मारून..

डोंबिवलीतील धक्कदायक बातमी रात्री प्रवाशांच्या डोळ्यात स्प्रे मारून..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version