Friday, September 27, 2024

Latest Posts

कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान यंदा कोणाला?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. पण आता पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला मिळणार यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर तोडगा न निघाल्यास विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांना देण्यात येतो. यंदा कार्तिकी वारी २३ नोव्हेंबर रोजी असणार आहे. वारीच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा मान कोणाला द्याचा हे अजून स्पष्ट झाले नाही.

पंढपूरच्या मंदिर समितीमध्ये अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीकडून चर्चा करण्यात येणार आहे. मात्र या चर्चेतून प्रश्न न सुटल्यास विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्यात येते. २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी वारी असणार आहे. त्यासाठी काल मंदिर समितीची बैठक झाली. सध्या राजकारणात नवीन घडामोडी चालू असल्यामुळे राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. कार्तिकी पूजेला एकच उपमुख्यमंत्री बोलवून पूजा केली जाते. गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. पण या वर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा मान कोणाला द्याचा हा पेच मंदिर समितीला पडला आहे. एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी समितीला परवडणार नाही. मंदिर समितीची मुदत संपून अडीच वर्ष झाली तरी अजून नवीन समितीबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने कोणाची नाराजी नको असे मंदिर समितीने सांगितले आहे.

कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायचे याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचा निर्णाय मंदिर समितीने घेतला आहे. आम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्री तेवढेच मानाचे असल्याने आता विधी व न्याय विभाग जो निर्णय देईल त्यानंतर कार्तिकी महापूजेचे निमंत्रण त्या उपमुख्यमंत्र्यांनी दिले जाईल असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.

Latest Posts

Don't Miss