Appasaheb Dharmadhikari कोण आहेत ? घ्या जाणून

आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) याचे मूळ नाव दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी आहे. त्यांचा जन्म १४ मे १९५१ मध्ये झाला होता. हे एक महाराष्ट्रतील भारतीय समाजसेवक आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी हे नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र आहेत.

Appasaheb Dharmadhikari कोण आहेत ? घ्या जाणून

आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) याचे मूळ नाव दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी आहे. त्यांचा जन्म १४ मे १९५१ मध्ये झाला होता. हे एक महाराष्ट्रतील भारतीय समाजसेवक आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी हे नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र आहेत. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल टाकत आप्पासाहेब हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क रक्तदान शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन, अनेक व्यसनमुक्ती केंद्र इत्यांदी कार्यक्रम आयोजन त्यांनी केले. २०१४ मध्ये मध्ये डी.वाय पाटील विद्यालय नेरुळ यामध्ये त्यांना विद्यालंकार हि पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते. २०१७ यामध्ये ते सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पुरस्कार पद्मश्री ने सन्मनींत करण्यात आले होते.

आप्पासाहेब धर्माधिकारी हे रायगड जिल्यात समाजसेवेचे काम करत असून जेष्ठ निरूपकार म्हणून ओळखले जातात. राज्यभरात लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी असून रेवदंडा या त्याच्या कर्मभूमीत नेहमीच गर्दी असते. आप्पा साहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील ओळखले जाणारे महत्वाचे समाजसेवक आहेत. अनेक राज्यातील पक्ष पार्टीमधील नेते त्यांना आणि त्याच्या कुटूंबाना गुरु मानतात. महाराष्ट्राचे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ते गुरु आहेत. त्यामुळे मुखमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे जेव्हा आप्पासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) गेले होते. अलीकडच्या काळातील मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या यशस्वी चळवळीचे प्रत्यंतर देत आले आहे. धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी त्याचे वडील नानासाहेब धर्माधिकारी हे सुद्धा समाजसेवक होते. धर्माधिकाऱ्यांच्या गव्हामध्ये हि परंपरा चारशे वर्षांपासून चालू आहे. नानासाहेब धर्माधिकारी याना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्या आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार,महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आणि त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरवीत करण्यात आले. जेव्हा हा पुरस्कार त्यांना देणार होते त्यावेळी खारघर येते ५१० एकर च्या जमिनीत चाळीस लाखाहून अधिक लोक जमा झाले होते. या गर्दीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये झाली आहे.

हे ही वाचा:

आमचं ‘सर्वसामान्यांचे सरकार’ बोलतात मात्र कुठेही महागाई कमी करण्याचा…, अजित पवार

Time Maharashtra Exclusive, मोठी बातमी; आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version