Tuesday, July 2, 2024

Latest Posts

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार ?

महायुतीतील नेत्यांच्या नावांनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा)आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील उमेदवारासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही आहे मात्र कॉंग्रेसकडून नसिम खान, संध्या सव्वालाखे, मुजफ्फर हुसैन यांच्या नावाची चर्चा आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील ही नावे चर्चेत जरी असली तरी विधानपरिषेदवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

लोकसभेनंतर आता विधानसभेकडे सर्वाचंच लक्ष आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला(Maharashtra Monsoon Session 2024) काल २७ जून पासूनच सुरुवात झाली. या सरकारचं हे शेवटचं अंतिरिम अर्थसंकल्प होणार आहे. काही आमदारांनी आपलं नाव दिल्लीत संसदेच्या बाकावर कोरल्याने महाराष्ट्रातील विधानपरिषदेतील काही जागा ही रिक्त झाल्या.मात्र आता त्या जागेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या  १४ जागा रिक्त असून त्यापैकी ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण ११ जागांसाठी पुढील महिन्यात १२ जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे.पण या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून काही नावांची चर्चा सुरु आहे. ते नावं नेमकी कोणती आहेत हे आपण पाहुयात.

विधानसभा आणि विधानपरिषदेचं (Vidhansabha and Vidhanparishad) विशेष अधिवेशन सुरु आहे. येत्या १२ जुलै रोजी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. मात्र यात भाजपने चार ते पाच जागांवर आपले उमेदवार देणार असल्याचं ठरवलं आहे.यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांचं नाव यादीत आहे. लोकसभेसाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीडमधून उमेदवारी  दिली होती मात्र राष्ट्रवादीकॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केल्याने आता विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडेंना संधी मिळणार का हे समजेल. त्याचबरोबर जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांचा पराभव झाल्याने त्यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केंद्राकडे काही नावांसाठी प्रस्ताव  देखील पाठवला आहे. त्यात,भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh), भाजप नेते महादेव जानकर(mahadev Jankar), आ.हर्षवर्धन पाटील यांचं नाव यादीत असल्याचं समजतं आहे.

भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांच्या शिवसेनेतील महिला उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे. त्यात विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे(Nilam Gorhe) यांचा समावेश असून यवतमाळ सारख्या जिल्ह्यात खासदार म्हणून काम पाहिलेल्या भावना गवळी यांची देखील वर्णी लागण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील नेत्यांचं पाहिल तर राजेश विटेकर, संजय दौंड, या दोन नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

महायुतीतील नेत्यांच्या नावांनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा)आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील उमेदवारासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही आहे मात्र कॉंग्रेसकडून नसिम खान, संध्या सव्वालाखे, मुजफ्फर हुसैन यांच्या नावाची चर्चा आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील ही नावे चर्चेत जरी असली तरी विधानपरिषेदवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss