Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Maharashtra Assembly Monsoon Session मध्ये कोणाची उपस्थिती? काय घडलं खास?

विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज २७ जूनपासून मुंबईत प्रारंभ झाला.  विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ व जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपाध्यक्ष नरहरी झिरवाळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितगृहनिर्माण मंत्री अतुल सावेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेक्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील  मंत्री  तसेच विधानसभेचे सदस्य  उपस्थित होते.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव मांडला. विधानसभेत दिवंगत सदस्यांना यावेळी सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्य पांडुरंग निवृत्ती पाटील (सडोलीकर)माजी मंत्री प्रतापराव बाबुराव भोसलेमाजी राज्यमंत्री मिनाक्षी प्रभाकर पाटीलमाजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेवराव गाडेमाजी सदस्य त्र्यंबक पांडुरंगराव कांबळेदगडू यशवंतराव गलंडेडॉमनिक जॉन गोन्सालवीसविश्वास कृष्णराव गांगुर्डेगंगाराम पोशट्टी ठक्करवाड यांच्या दुःखद निधनाबद्दल आज विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. दिवंगत सदस्यांच्या कार्याला यावेळी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी उजाळा दिला. सभागृहात दोन मिनिटे मौन बाळगून दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक

राज्याचे पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढीसंदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार २९ जून २०२४ रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधीदूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. या बैठकीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांनी सांगितले.

हे ही वाचा:

Atul Bhatkhalkar यांनी सांगितले ३ मिनिटांच्या भेटीचे गमक

‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss