spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गटाचा मेळावा दुसरीकडे घेण्याचे संकेत ?

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की तो शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर घुमणारा ठाकरेंचा आवाज. सुरुवातीपासूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भव्य सभा याच शिवाजी पार्क मैदानावर होत असत. पण २०२२ ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्याच्या सभेसाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून दसऱ्याला शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार याची चर्चा रंगत आहे.

दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार?
शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी मागील आठ महिन्यात मुंबई महापालिकेला अर्जासह तीन स्मरणपत्र देण्यात आल्याचे समजले. परंतु शिवसेना शिंदे गटाकडून याबाबत अजून कोणताही अर्ज गेला नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शिवाजी पार्क मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून आधीच अर्ज दाखल करण्यात आला आहे परंतु शिवसेना शिंदे गटाकडून कोणताही अर्ज दाखल झाल्याची माहिती नाही. त्यामुळे यंदा शिवाजी पार्क मैदानावर नेमकी कोणाची सभा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना शिंदे गटाचा मेळावा दुसरीकडे आयोजित ?
२०२३ मध्ये शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली होती. मुंबई महापालिकेने ठाकरे गटासाठी परवानगी नामंजूर केली होती. मिळालेल्या परवानगीनुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा २४ ऑक्टोबरला पार पडला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत मिळाले होते.

हे ही वाचा:

Nitesh Rane यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर Ambadas Danve यांचा टोला; गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक…

गुलामीच्या खुणा पुसण्याचे काम PM Narendra Modi करत आहेत, Port Blair नामांतरावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss