spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुन्हेगार पोलिसांवर भारी, रात्री उशिरा अंधारात का थांबले? विचारणा केल्यास पोलिसांनाच मारहाण

पुण्यात पोलिसांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना पुण्यातील दौंडमध्ये मौजे दौड गावच्या हद्दीत राजवाडा हॉटेलजवळ घडली असून दौंड पोलीस स्टेशनमधील एका पोलीस हवालदाराला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे .महेश सदाशीव भोसले असे या पोलीस हवालदाराने नाव आहे . रोजप्रमाणे गस्त घालत असताना त्यांना मारहाण करण्यात आली आहे . महेश भोसले यांच्याकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे . आरोपींचा शोध सुरु आहे .

महेश भोसले हे रोजप्रमाणे रात्री गस्त घालत होते. साधारण रात्री १२ च्या सुमारास राजवाडा हॉटेल परिसरात ५ जण अंधारात गाडी लावून थांबलेले होते .
गस्त घालत असताना भोसलेनी त्यांना पहिले व त्यांची विचारपूस केली .तुम्ही या ठिकाणी का थांबला असे काही प्रश्न भोसले यांनी विचारले त्यावर त्यांच्यातील दोन जणांनी पोलीस असल्याचे पाहून हवालदार भोसलेंवर अरेरावीची भाषा केली तुम्ही काय आमचं वाकडं करणार अशा भाषेत पोलिसांनाच प्रश्न करत त्यांच्या अंगावर गेले तसेच हवालदार भोसले याना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी देखील केली हळू हळू हा वाद वाढत गेला व नंतर त्यातील एकाने पोलिसाच्या कानशिलात लगावली आणि मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांना मारहाण करुन सगळ्यांनी जागेवरुन पळ काढला. घडलेल्या प्रकाराबाबत भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत

मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये पोलिसांना मारहाण झाल्याच्या बऱ्याच धक्कादायक घटना समोर आल्या आहेत .पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करुन आणि ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्याबरोबरच पुण्यातील धानोरीत भर रस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. चार-पाच जणांचा गाडी काढण्यावरुन पोलिसांशी वाद झाला , वाद वाढल्यावर हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीत पोलीस कर्मचारी यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली . त्यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षकांवर हल्ले होणार असतील तर सर्वसामान्य पुणेकर सुरक्षित आहेत का ?असा प्रश्न उपस्थित होतो .

हे ही वाचा:

तणाव : काश्मीरची दाहकता दाखवणारी आगामी वेबसीरीज लवकरच

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची FDA विरोधात हायकोर्टात धाव

पंतप्रधान मोदींनी मांडली ‘एक राष्ट्र, एक गणवेश’ ची कल्पना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss