शिक्षिकेने नेमकं का केले असे विधान?

कर्नाटकातील शिवमोग्गा जिह्ल्यातली एका शाळेत शिक्षिकेवर दोन मुस्लिम विध्यार्थ्यांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिक्षिकेने नेमकं का केले असे  विधान?

कर्नाटकातील शिवमोग्गा जिह्ल्यातली एका शाळेत शिक्षिकेवर दोन मुस्लिम विध्यार्थ्यांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारत हिंदू राष्ट्र आहे तुम्ही पाकिस्तानात निघून जा असे शाळेतील शिक्षिकेने सांगितले. त्यांनतर शिक्षिकेची बदली करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येणार आहे. जनता दल सेक्युलरच्या अल्पसंख्याक शाखेचे शिवमोग्गा जिल्हाध्यक्ष नजरुल्ला यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. शिक्षिका मंजुलाला देवी पाचवीच्या वर्गातील मुलांना शिकवत असतात दोन मुलांमध्ये आपापसांत भांडण झाली. तेव्हा शिक्षिकेने मुलांना खडसावून सांगितले ‘ हा त्याचा देश नाही हा हिंदूंचा आहे’.

या घटनेची चौकशी केल्यांनतर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (BEO) बी नागराज यांनी सांगितले कि शाळेतील इतर मुलांनी देखील या घटनेला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर ते बोले ‘ शिक्षकाने विद्यार्थ्यांना कथितपणे सांगितलं की, हा तुमचा देश नाही, हा हिंदूंचा देश आहे आणि त्यामुळे तुम्ही पाकिस्तानात जा. तुम्ही आमचे कायमचे गुलाम आहात’. या सर्व प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी या प्रकरणाचा अहवाल देखील सादर केला आहे.


काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. यूपीतील मुझफ्फरनगरमध्ये एका मुस्लिम विद्यार्थ्याला शाळेतील इतर मुलांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हयरल झाला होता. या व्हिडिओमध्ये वर्गातील महिला शिक्षिकेने त्या मुलाला मारहाण करण्यासाठी सांगितले होते. शिवाय शिक्षिका देखील या विद्यार्थ्याला बोलताना दिसत होती. मारहाणीचे हे प्रकारण पेटल्यानंतर विरोधी पक्षांनी यासाठी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version