‘आनंदाचा शिधा’ आदेश का आश्वासन ?

‘आनंदाचा शिधा’ आदेश का आश्वासन ?

दिवाळी आठवड्यावर येऊन सुद्धा आनंदाचा शिधा म्हणजेच, तेल, साखर, रवा आणि चणाडाळ स्वस्त धान्य अद्याप राज्यातील जनतेला मिळालेले नाही.

राज्यसरकारने ४ ऑक्टोबर रोजी परिपत्रकही काढले त्यामध्ये या वस्तूंना ‘आनंदाचा शिधा’ असेही बोलले जात आहे. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केसरी) रेशनकार्डधारक यांना नियमित अन्नधान्यांव्यतिरिक्त हा शिधा शंभर रुपयांमध्ये मिळणार आहे असे त्या पत्रकात लिहिले होते.
यामुळे ह्या वर्षीची दिवाळी सर्वसामान्यांसाठी अधिक दिपमय होऊन राज्यातील सात कोटी व्यक्तींना याचा फायदा होईल असं सांगण्यात आलं. त्यासाठी घाईघाईत एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचं कंत्राट देखील देण्यात आलं.मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना देखील हा आनंदाचा शिधा स्वस्त धान्य सर्वसामान्य नव्हे तर अद्याप दुकानापर्यंतही पोहोचलेला नाही.

सर्वांचा आवडता सण असलेल्या दिवाळीला आता काही दिवस उरले आहेत. त्यामुळे फराळाचे पदार्थ बनवण्याचे वेध लागलेल्या गृहिणी स्वस्त धान्य दुकानांमधे १०० रुपयांत मिळणारा आनंदाचा शिधा घेण्यासाठी पोहोचत आहेत. फक्त शंभर रुपयांमधे एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो तेल देण्यात येईल असं राज्य सरकारने जाहीर केलंय त्यामुळे आपलीही दिवाळी गोड होईल या आशेने लोक दुकानांमध्ये पोहोचत आहेत. पण ग्राहकांना फक्त जाहिरातीवरच समाधान मानावं लागतय. कारण सरकारचा हा आनंदाचा शिधा अद्याप दुकानांपर्यंत पोहोचलाच नाही.

१० ऑक्टोबरपासून हा शिधा मिळेल असं आधी जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर ही तारीख वाढवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. ती देखील उलटली मात्र तरीही शिधा दुकानापर्यंत पोहोचलेला नाही. गृहिणी दुकानांमधे दररोज शिधा आला का? म्हणून चौकशी करत आहेत. पण त्यांना मोकळ्या पिशवीसह परतावं लागतय. त्यामुळे दिवाळीच्या आधी हा शिधा सर्वसामान्यांना मिळेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे .

हे ही वाचा :

आयशर-रिक्षाच्या भीषण अपघा पाच ठार, दोन जखमीतात

Diwali Gift : चक्क मालकाने दिवाळी गिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक दिली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version