Sunday, June 30, 2024

Latest Posts

बहिणीच्या वाढदिवसाला “मोठा भाऊ” साद घालणार का?

सुप्रिया सुळे (Supriya sule ) या महाराष्ट्रासह संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेतच पण त्याचबरोबर त्यांच्या कामामुळे आणि राजकीय कारकीर्दीमुळे देखील त्या जगतविख्यात आहेत.सुप्रिया सुळे (Supriya sule ) यांचा वाढदिवस दरवर्षी थाटामाटात आणि जल्लोषात होत असतो. मात्र यंदा भाऊ कुटुंबासोबत एकत्रित नसल्याने यंदाचा हा वाढदिवस त्यांच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेगळा असणार आहे. 

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule )यांचा आज ५५ वा वाढदिवस.. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, समर्थक आणि पक्षातील नेत्यांनी भावनिक पोस्ट लिहत सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवारांची (Sharad Pawar)लाडकी लेक म्हणून सुप्रिया सुळे (Supriya sule ) या महाराष्ट्रासह संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेतच पण त्याचबरोबर त्यांच्या कामामुळे आणि राजकीय कारकीर्दीमुळे देखील त्यांची राज्यभरात ख्याती आहेत.सुप्रिया सुळे (Supriya sule ) यांचा वाढदिवस दरवर्षी थाटामाटात आणि जल्लोषात होत असतो. मात्र यंदा भाऊ कुटुंबासोबत एकत्रित नसल्याने यंदाचा हा वाढदिवस त्यांच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेगळा असणार आहे.

१० जून १९९९ साली राष्ट्रवादी (Rashtravadi)या पक्षाची स्थापना झाली आणि शरद पवारांची (Sharad Pawar)वर्णी राष्ट्रीय अध्यक्ष पदी लागली.पक्षाच्या स्थापनेपासून लेकीची साथ ही वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे होती. पक्षात अनेक जणं सामील झाले. पक्षाचं नाव लौकिक होत गेलं. “राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी”असं समीकरण संपूर्ण महाराष्ट्रात कोरलं गेलं. त्या क्षणापासून दोन जणांनी शरद पवारांनी (Sharad Pawar)अगदी उत्कृष्टरित्या अशी साथ दिली ते म्हणजे सुप्रिया सुळे (Supriya sule ) आणि अजित पवार(Ajit pawar) यांनी..

 

राष्ट्रवादी पक्षात अनेकदा फूट पडण्याच्या घटना झाल्या तरी देखील सुप्रिया सुळे (Supriya sule ) यांनी आपल्या वडिलांसोबत एकनिष्ठेने काम केले आणि त्यांचीच साथ देण्याचा निर्णय घेतला. सगळं सुरळित सुरु आहे असं वाटत असताना अजित पवारांनी(Ajit pawar) २ जुलै २०२३ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काकांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर नव्या राष्ट्रवादीची घड्याळ चिन्हासह स्थापना झाली आणि “पवार”कुटुंबात फूट पडली. आता पवार विरुद्ध पवार असं समीकरण अवघा महाराष्ट्र बघत आहे. राजकारण बाजूला ठेवून ‘अजित दादा’हे कौटुंबिक सोहळ्यात हजर राहतील असं वाटत होतं.मात्र माध्यमांवर चर्चा रंगतील या कारणाने कदाचित दादांनी भेट घेणं टाळलं. काकांची साथ जरी सोडली असली तरी बहिण- भावाचं हे अतुट नातं तुटणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या.

 ज्या बहिणीसोबत लहानपण घालवलं. त्याच बहिणीची राजकीय विश्वसोडून कौटुंबिक विश्वात शेवटपर्यंत साथ देणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule ) यांच्या वाढदिवस आणि या शुभदिनानिमित्त मोठा भाऊ शुभेच्छा देणार का ? राजकीय मतभेद किती ही असले तरी जन्मोजन्मीचं नात हे शब्दापलीकडे असतं. त्यामुळे त्याच बहिणीच्या वाढदिवसाला भाऊ साद घालणार का ? असा प्रश्न आज सुप्रिया सुळे (Supriya sule ) यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित होत आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss