spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रद्द केलेले कृषी कायदे मोदी सरकार परत आणणार ?

नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. यामध्ये ३० पेक्षा जास्त शेतकऱ्‍यांचा आंदोलनात बळी गेला होता. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचं म्हणत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर मोदी सरकारने कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती.

नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. यामध्ये ३० पेक्षा जास्त शेतकऱ्‍यांचा आंदोलनात बळी गेला होता. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचं म्हणत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर मोदी सरकारने कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान हे कायदे परत आणले जाणार असल्याती माहिती मिळत आहे. कृषी कायद्यांबाबत अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. पाशा पटेल या समितीचे सदस्य आहेत. ते म्हणाले, ही समिती एका महिन्यात आपला अहवाल केंद्र सरकारसमोर सादर करेल. कृषी कायद्यांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत असंही पटेल यांनी सांगितलं.

कृषी कायदे परत आणले जाणार असल्याची माहिती पाशा पटेल यांनी व्यक्त केली. कायद्यात बदल सुचवले मात्र हे कायदे परत आणले जाणार. एका महिन्यात समितीचा अहवाल सादर होणार, असे पटेल यांनी सांगितले. पाशा पटेल हे समितीचे सदस्य आहेत. पाशा पटेल म्हणाले, “केंद्र सरकार कृषी कायदे परत आणणार आहे. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितले होते की हा विषय विरोधकांना समजावून सांगण्यात ते कमी पडले त्यामुळे कायदे परत घेतोय. मात्र कायद्याचा अभ्यास करुन कायदे परत आणणार असे, मोदी म्हणाले होते. केंद्र सरकारने ५ सदस्यांची समिती स्थापन केली त्यामध्ये मी सदस्य आहे. कायद्याचा अभ्यास पूर्ण झाला असून एक महिन्याच्या आम्ही केंद्र सरकारला अहवाल देणार आहोत. त्यानंतर केंद्र सरकार याची अमलबजावणी करु शकते, अशी माहिती पाशा पटले यांनी दिली. शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा, शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि शेती सेवा कायदा आणि आवश्यक वस्तू (सुधारणा) कायदा हे कायदे करण्यात आले आहेत.

केंद्रातल्या मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये तीन कृषी कायद्यांची घोषणा केली होती. परंतु, या कायद्यांना देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पंजाब, हरियाणातल्या शेतकऱ्यांनी या कृषी कायद्यांविरोधात मोठं आंदोलन उभं केलं. तब्बल एक वर्षाहून अधिक काळ हे शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनानंतर मोदी सरकारने माघार घेतली. सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी हे कृषी कायदे परत आणले जातील असं वक्तव्य भाजपा नेते पाशा पटेल यांनी केलं आहे.

हे ही वाचा: 

मराठी लिटिल चॅम्प्सच्या सेटवर अशोक मामा झाले भावुक…

राम मंदिराच्या बांधकामादरम्यान मिळाले प्राचीन अवशेष

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss